-
मुग्ध गारवा – MUGDH GAARAVAA
पौषामधली पहाट माझ्या मनात नीतळ गाणे गाते मम आईच्या मृदुल मनाची झुळूक शीतल गाणे गाते मुग्ध गारवा सुखद शहारा अंगागाला स्पर्शून जाता मौनी पदपथ अविचल तारे निश्चल सळसळ गाणे गाते असशिल कोठे ठाऊक नाही तरी कल्पना मनी खेळते निवांत वेळी शांत एकटा गाठुन तरुतळ गाणे गाते
-
गारवा – GAARAVAA
केळी द्राक्षे दहिभाताचा धाड गारवा तोलायाला वजने मापे एक ताजवा बसून जेवण करण्यासाठी अंथर चटई असेल जेथे थंड जलाचा स्वच्छ कालवा मिरचीठेचा उसळ मुगाची झुणका भाकर चवीचवीने खाइल चिमणी द्वाड पारवा गाजर-हलवा चिक्की बर्फी पानसुपारी देउन तिळगुळ नात्यांमधला जपू गोडवा किलबिल करतिल मुले पाखरे झाडांभवती फुलेल मोहक कळ्याफुलांचा शुभ्र ताटवा
-
कनक कस्तुरी – KANAK KASTUREE
कनक कस्तुरी उधळुन गेली, आई माझी मुक्ती रमणी कोमल सुमने फुलवुन गेली, आई माझी मुक्ती रमणी स्वर्गामधले विमान पुष्पक, घेउन येता माझे दादा दवबिंदुंना माळुन गेली, आई माझी मुक्ती रमणी अनेक कन्या पुत्र तिचे प्रिय, दादा पण तिज, प्राणाहुन प्रिय त्यांच्या वाटा शोधुन गेली, आई माझी मुक्ती रमणी गझला कविता कथा समीक्षा, हृदयापासुन तिने जाणल्या…
-
खरे नबाबी – KHARE NABAABEE
नको निळे अन, नको गुलाबी, पत्र धाड रे खरे नबाबी लिहुन मायना, वहिनी भाभी, पत्र धाड रे खरे नबाबी रंग रुपाची, सुमार चर्चा, हेवेदावे, तू तू मी मी वगळुन असल्या, क्षुल्लक बाबी, पत्र धाड रे खरे नबाबी रंगबिरंगी, फूल सुरंगी, सुकले अथवा, असो कागदी सुगंध घोळुन, त्यात शबाबी, पत्र धाड रे खरे नबाबी नको प्रिय…
-
भागिदारी – BHAAGIDAAREE
खूप म्हणजे खूप रुचली स्वाभिमानी भागिदारी विकृतीला तुडविणारी भावनांची भागिदारी पेरुनी मातीत मोती पीक येते सप्तरंगी फाल्गुनाला आज कळते श्रावणाची भागिदारी चारुशीला रामपत्नी कमलनयना जनककन्या मैथिलीला पुरुन उरली रावणाची भागिदारी उंबरा नाकारतो हे मैत्र वृंदा रुक्मिणीचे का बरे त्याला पटेना अंगणाची भागिदारी शारदेच्या चांदण्यांसम फुलुन येता रातराणी तरुतळी स्वप्नात रमते मोगर्याची भागिदारी वृत्त – गा…
-
हात सुंदर – HAAT SUNDAR
घडविती सौंदर्य सारे हात सुंदर लाभली धरणीस त्यांची साथ सुंदर अंगुली रंगात भिजुनी कृष्ण होता भावली गगनास त्यांची जात सुंदर माळुनी हृदये फुलांची स्वप्नवेडी धावतो रानात वेडा वात सुंदर या भुजांनी खोदल्या विहिरी मनातिल उसळते त्यातून पाणी गात सुंदर अंतरातिल वादळाला तोंड देण्या तळपते ही लेखणीची पात सुंदर वृत्त – गा ल गा गा, गा…
-
सोने खरे रे – SONE KHARE RE
सोपे दिसे रे अनवट कसे रे कोडे पडे रे नाते नवे रे नकळत फुले रे व्हावे खुले रे आहे जुने रे अवघड कुठे रे सोने खरे रे मात्रावृत्त (४+३+२=९ मात्रा)