Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • यंत्रयुग हे ते – YANTR YUG HE TE

    पोट झडाया डोकयंत्र हे ते सोकविण्या मन सोकयंत्र हे ते टोक कराया टोकयंत्र हे ते पाठ कराया घोकयंत्र हे ते विनोद सांगे जोकयंत्र हे ते हळू टोचण्या पोकयंत्र  हे ते नशा यावया झोकयंत्र  हे ते चोप द्यावया फोकयंत्र  हे ते मागे ओढी ढोकयंत्र  हे ते इंजिन पळवी कोकयंत्र  हे ते दिशा सांगण्या होकयंत्र  हे ते…

    July 2, 2014
  • कीर्द खतावणी – KEERD KHATAAVANEE

    कुणी कुठून आणली कीर्द खतावणी फुका पुसे खडूस बोचरे प्रश्न असे तसेच का हवीस तू मला गडे बोलतसे फुलास तो अशाच सांगुनी कथा रमवतसे स्वतःस का कधी उशीर जाहला फी तुज द्यायला मला उगाच चौकशा करी सांग मिळे पगारका हिशेब छान शिकविले शिस्त जरी कडक असे हुशार मी खरी खरी जाणुन गोष्ट मौन का गुरूपणा…

    July 1, 2014
  • बाकी – BAAKEE

    काय राहिले सांग प्रियतमा लिहावयाचे बाकी किती राहिले पत्थर अजुनी भिजावयाचे बाकी दगडावरती साठत गेली बांधावरची माती बोल केवढे अंकुर आता रुजावयाचे बाकी कैक भरवल्या खतावण्या तू लिहून भाकड गोष्टी पात्र कोणते कथांतल्या त्या रडावयाचे बाकी चंचलपण तव नकोस मिरवू उघड चंचले चंचू उकरुन माती टाक पुरून जे पुरावयाचे बाकी पोपटपंची नको नाटकी पूस ‘सुनेत्रा’…

    July 1, 2014
  • बोर जाहले बोर – BOR JAAHALE BOR

    तू तू  यू यू करता करता बोर जाहले बोर टमटम मध्ये बसून गावे फिरे नाचरा मोर संत असूनी करतो चोऱ्या चोरांचा बघ शोर खऱ्याच चोऱ्या करण्या मग तो संत जाहला चोर कुत्रा घोडा डुक्कर बनतो फक्त पुरवण्या कोड अश्या अडाण्याच्या हाती तू नको सोपवू पोर कबूल करुनी चुका स्वतःच्या उतरलात हो खोल झरझर चढुनी याहो…

    June 28, 2014
  • बोला आता खरे खरे – BOLAA AATAA KHARE KHARE

    मुदत संपली लपवायाची बोला आता खरे खरे सांगुन सांगुन दमलो चिडलो सत्यच सांगा खरे खरे कशास केली लपवाछपवी भले कुणाचे करावया अता न कुठली वाट तुम्हाला इकडे तिकडे पळावया चारित्र्याचा मिरवित तोरा फिरला तुम्ही इथे तिथे चारित्र्याची ‘असली’ व्याख्या तुम्हा कळाली कधी कुठे भ्रमात भिजवुन बुद्धी अपुली काय जाहले जीवाचे अहंकार अन हवस मनाची लाड…

    June 28, 2014
  • अव्वल – AVVAL

    नव्या युगाचे सुंदर माझे गाणे ऐकत आहे अंबर माझे गाणे लेखणीतुनी झरती जैसे मोती हृदयामधले घुंगर माझे गाणे रक्तपात अन  टाळत अकाल मृत्यू जिंकिल आता संगर माझे गाणे फुलण्यासाठी हिरवी सृष्टी  बनते निळ्या नभातिल झुंबर माझे गाणे सदा ‘सुनेत्रा’ साऱ्यांमध्ये अव्वल पहिला पहिला नंबर माझे गाणे मात्रावृत्त – (८+८+४=२० मात्रा)

    June 27, 2014
  • बाईपणा – BAAEEPANAA

    रत्नात रत्न सुंदर बाईपणाच माझा सांगे लिहावयाला आईपणाच माझा संस्कार वर्ग माझा शिकण्यास रीतिभाती जपतो मुलाफुलांना दाईपणाच माझा ती मूढता तयांची वेगास खीळ घाली नडणार कोडग्यांना घाईपणाच माझा मम लेखणीत शिरुनी या वासरीवरीरे मांडेल भावनांना शाईपणाच माझा नसते कुटील कपटी माया खऱ्या गुरुंची मायेस साक्ष त्यांच्या माईपणाच माझा जेथे नको तिथेही हे मारतात शेरे लावेल…

    June 26, 2014
←Previous Page
1 … 196 197 198 199 200 … 286
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya