-
गाणारी परी – GAANAAREE PAREE
काही क्षण तरी संपुदेत भावना अन विचार डोकं व्हावं शांत गार गार… पैशासाठी अडवे वाणी नळाला नाही पाणी आजाऱ्याला दवापाणी सततची आणीबाणी! तरीही सुचतातच गाणी गाणी गाणी गाणी… म्हणूनच गाण्यांनो आता थोडावेळ तरी द्या विश्रांती खरी.. चार कामं करेन घरी पगार मिळता खाऊन पिउन दिसेन थोडी तरी बरी .. कष्ट करून खरोखरी पाडेन पैशाच्या सरी…
-
हरिण-कस्तुरी – HARIN-KASTUREE
दवबिंदुंचे उदक साठवुन सहाण भरली हसली काष्ठ चंदनी फिरता वरती फूल सुवासिक बनली बनी केतकी नागिण फिरते सळसळणारी चपला कैद कराया तिज बुंध्याला बिजलीने कंबर कसली पुष्पपरी मी उडेन आता म्हणत म्हणत ती पडली मृद्गंधित घन मातीमध्ये लोळुन लोळुन दमली चपळचंचला संयमधर्मे उडून जाता स्वर्गी नागफण्यासम श्यामल सुंदर वीज नभी लखलखली वनहरिणी ती ऐकत गाणे…
-
काट्यास काढतो मी – KAATYAAS KAADHATO MEE
शुन्यात पाहतो मी पुण्यात डुम्बतो मी प्राचीवरी उगवुनी शुक्रास शोधतो मी सायीस मस्त घुसळुन लोण्यास काढतो मी अश्रूतल्या मिठाला नक्कीच जागतो मी तव भावनेस सप्पग लवणात घोळतो मी सलतो तुला सदा त्या काट्यास काढतो मी सारे फितूर वारे पंख्यात डांबतो मी होऊन कृष्ण काळा गाईंस राखतो मी सांजेस केशरीया रंगात माखतो मी वृत्त – गा…
-
टमाटे – TAMAATE
आज टमाटे संपव तू चित्र नव्याने रंगव तू वहीवरी जे लिहिशी ते अक्षर अक्षर टंकव तू द्वेषाचे अन भोगाचे शिल्प बुभुक्षित भंगव तू वासनेत ती बुडे जरी प्रेमाने तिज गंडव तू तापवणाऱ्या डोक्यांना सतत बोलुनी भंडव तू घाण साठता कोंड्याची पूर्ण कुंतले मुंडव तू सम्यकदर्शन होण्याला आत्मियात तिज गुंगव तू नकोस टाळ्या टाळ पिटू गझली…
-
बदाम आंबा – BADAAM AAMBAA
चोखुन चोखुन आंबा खा चवीत पुरता बुडून जा आंबा आहे भलता गोड त्याच्याशी तू नाते जोड कर योगा अन होना रोड नाद जीमचा आता सोड नकोस ठेवू भीड नि भाड मुजोरड्यांना पाडच पाड पाण्यामध्ये होडी सोड पुरव जिवाचे कौतुककोड होशील आता मालामाल हंसासम डौलाने चाल नको घाबरू वळणांना वळणावरच्या थांब्यांना हवा कशाला तुज थांबा तू…
