-
धर्म दिगंबर जैनांचा – DHARM DIGAMBAR JAINANCHAA
टिकेल आता येथे सुंदर धर्म दिगंबर जैनांचा देवघरातिल बोले झुंबर धर्म दिगंबर जैनांचा गातो पक्षी झुळझुळ वारे वाजे पावा कृष्णाचा पृथ्वीसंगे गाते अंबर धर्म दिगंबर जैनांचा तीर्थ बनविले अरिहंतांनी मार्ग दाविण्या आम्हाला आदिनाथ वा असुदे शंकर धर्म दिगंबर जैनांचा जीवांमधली ठिणगी फुलण्या सदासर्वदा दक्ष रहा जमेल तितुकी घाला फुंकर धर्म दिगंबर जैनांचा लेन्स असूदे अथवा…
-
पाउस सरी – PAAOOS SAREE
रिमझिम झिमझिम बरसत वर्षत याव्या पाऊस सरी नाचत खिदळत अंगावरती घ्याव्या पाऊस सरी टपोर मौक्तिक जलदांमधले स्वप्नपरी वेचीते ओंजळीतुनी नाजुक तिचिया याव्या पाऊस सरी मेघ गडगडे वीज कडकडे राग गातसे भूमी मृद्गंधाशी करीत गप्पा गाव्या पाऊस सरी प्राजक्ताचा सुवास ओला भरून देहामध्ये ओलेत्या पण चिंब भिजाव्या न्हाव्या पाऊस सरी तप्त बाष्पयुत शुभ्र मेघना थंड होतसे…
-
कविता – KAVITAA
कविता असुदे वाकडी अथवा सरळ किंवा वेलांटीदार वळणा वळणाची ! तिचं वाकडेपणसुद्धा कधी कधी जपावं ! तिचं सरळपण साधावं तिची मोहक वेलांटीदार वळणे आपणही घ्यावीत… वेलांटीत वाकावं, उकारात उडावं ! काना मात्र्यात टिपावं चिंब भिजलेलं मन ! मग नकळत हसावं विसर्गात अधर किंचित वक्र करून ! कविता असतेच एक हलकी मोळी गझल वृत्तात बांधल्यास होते…
