-
शब्दांजली – SHABDAANJALEE (tribute in words)
खाणदेश अन विदर्भ कोकण मावळ घाट नि मराठवाडा सह्याद्री अन सातपुड्यावर मजेत उडती बलाक माला जिवंत आहे शिल्प अजंठा अन वेरूळची कोरीव लेणी रायगडावर अजून घुमते शिवरायांची अमोघ वाणी धर्मवीरांची शांत गुरुकुले कर्मवीरांची धर्म साधना स्वर्ग कराया या भूमीचा अज्ञानाशी युद्ध सामना पुत्र येथला ऐसा गुंडा घटना लिहितो या देशाची किमया करिती इथे महात्मे स्त्रीशक्तीला…
-
मनभावन सृष्टी – MANBHAAVAN SRUSHTEE (charming creation)
मी कविता अन मी कवयित्री प्रतिभा मम आई विषय न कुठला वर्ज्य असे मज मी ठाई ठाई नकाच घालू मज अंगावर प्रासांचे दागिने पुरे जाहली सक्ती ऐश्या वृत्तातच उडणे नकाच शोधू माझ्यामध्ये जड जड प्रवृत्ती स्वच्छंदी मी चंडोलासम निर्भर मम वृत्ती चैतन्याला उडव उडवण्या मनभावन सृष्टी गाज अंतरी गर्जायाला प्रेमाची वृष्टी लिहिता लिहिता उसळत नाचत…
-
ऊन काहिली – UOON KAHILEE (agony caused by heat))
ऊन काहिली थंड कराया पाऊस गाणी झरती चला जाऊया सैर कराया डोंगर माथ्यावरती कुदळ फावडे घेऊन हाती हात आमुचे खणती तण उपटूया खड्डे करूया खांब रोवण्यासाठी भूमी मापन अचुक करूया घेऊन हाती काठी घाम गाळूया माती भरुया धावू वाऱ्यापाठी मडके भरुया सडा शिंपुया जमीन करण्या ओली लांबी रुंदी उंचीसंगे भरून टाकू खोली कुंपण गर्द कराया…
-
उठाठेवी – UTHAATHEVEE (medding)
कशाला या उठाठेवी, जना सांगावया काही उठा बोला मना सांगा, लिहाया लीलया काही कुणी नाहीच मोठारे, तसा नाहीच छोटाही अता छोटे बनूयाहो, बरे बोलावया काही कशी भाषा फुलावी रे, असे हे मौन लोकांचे जरा भांडा स्वतःशीही, चुका टाळावया काही नवी गीते रचू गाऊ, क्षमेने क्रोध जाळूया अहिंसा धर्म जीवांचा, खरा जाणावया काही करूया शांत पृथ्वीला,…
-
पुरे जिवाशी खेळ खेळणे – PURE JIVASHEE KHEL KHELANE (playing with a fire)
पुरे जिवाशी खेळ खेळणे काठावरुनी ऋतू जाणणे आषाढातिल मेघ पालखी फाल्गुन अस्सल रंग पारखी आश्विन मासी धवल चांदणे वैशाखाची कनक झळाळी कार्तिकातली जर्द नव्हाळी पौषामधले गगन देखणे चैत्र फुलोरा मृदुल पालवी भाद्रपदातिल ऊन सावली ज्येष्ठामध्ये आत्म पाहणे मार्गशीर्ष मोहक मनभावन गुलाबजल शिंपाया श्रावण माघामध्ये निवत तापणे
