-
मृगजळ – MRUGAJAL (mirage)
हाय! मी वेडी किती रे रंगले त्या मृगजळी चुंबिले प्रतिमेस भ्रामक दंगले त्या मृगजळी शिल्प कोणा प्रेमिकांचे घडवितो शिल्पी कुणी बनविता कैदी तयाला भंगले त्या मृगजळी बेरकी होत्याच वृत्ती वृत्त होते नेटके अर्थ पण फसवे परंतू संपले त्या मृगजळी यक्षही नावेत होते जादुई खुर्च्या तिथे चिकटले खुर्च्यांस जे जे गंडले त्या मृगजळी गझल सच्ची घेउनी…
-
उरेन मी – UREN MEE (I will remain)
जे मला पटेल तेच करेन मी जाळुनी पूरून हाव उरेन मी तूच बेजबाबदार नको म्हणू सांडली तशीच प्रीत भरेन मी पोहताच कालव्यात रुबाब का? सागरात भोवऱ्यात तरेन मी तू तुझा अहं गडे कुरवाळिशी जिंकताच ‘मी’पणास हरेन मी कागदी फुले जरी चुरगाळिली आजही बनून दुःख झरेन मी आठवांस त्या सुरेल अजूनही कोंडुनी रचून गीत स्मरेन मी…
-
ब्रीद -BRID ( good task,aim)
मतदानाला जाऊ सारे निघा घरातुन बाहेर मतदानाचे केंद्र सुरक्षित जणू साजिरे माहेर प्रातःकाळी उठून सगळी कामे करुया भरभर केंद्रावरती गर्दी होता रांगा लावू झरझर आठवणीने घेउन जाऊ ओळखपत्रे खरीखुरी मतदानाचा हक्क बजावुन आनंदाने येऊ घरी नको गुलामी पाय चाटणे स्व-अभिमानी बनू बरे अंधश्रद्धा पूर्ण उखडणे हे तर माझे ब्रीद खरे
-
माझे अडखळणे – MAZE ADAKHALANE (my stumbling)
जितुके दाहक तितुके मोहक माझे अडखळणे म्हणती साधक नसते बाधक माझे अडखळणे हळव्या कातर समयी भावुक प्रेमीजन म्हणती हटके राजस करते पातक माझे अडखळणे जल काचेतिल प्रतिबिंबासम काया झुळझुळता झुलते झुंबर हलता लोलक माझे अडखळणे वचने पेलुन शपथा झेलुन सांधे कुरकुरता बनते नाजुक असली नाटक माझे अडखळणे करण्या सावध मजला पाडुन पाणी खळबळता भलते साजुक…
