-
अलकनंदा – ALAK NANDA (NAME OF RIVER)
आनंद कंद बाणा चित्रात मंजुषेच्या ज्योती समान गाथा चित्रात मंजुषेच्या आहे प्रवीण दुहिता..नृत्यात अलकनंदा गाते सुरेल माया चित्रात मंजुषेच्या उत्फुल्ल रंजनेने घनदाट कुंतलांवर बघ माळलीय फांती चित्रात मंजुषेच्या ओढाळ माधुरीला रेखा कशी कळावी आहे निमात नीती चित्रात मंजुषेच्या संध्येस स्वप्न भारी फिल्मी नवी सुजाता स्वातीस मोतिमाला चित्रात मंजुषेच्या कविता न चारुशीला आकाश नीलिम्याची मधुमास चांदण्यांचा…
-
उधारी – UDHAARI (BORROWING)
मादक ओठांवरची मदिरा प्राशायाला हवी झिंग तयातिल चालीमध्ये मुरवायाला हवी स्पर्शाने मम उसळुन येता तव इच्छांचे नीर दो हातांनी लाट रुपेरी अडवायाला हवी मधुर गुपित चिरतारुण्याचे कळण्या मजला खरे तव नजरेतिल तडका मिरची चाखायाला हवी मिटशिल जेंव्हा नेत्रदलांना श्यामल तनूवरचे.. साठवुनी दव त्यातच मेंदी भिजवायाला हवी कुणास वाटे चोरी मारी असली तरही गझल.. कल्पकतेची म्हणे…
-
पुद्गला – PUDGALA (MATTER)
लीड घे ती म्हणाली घेऊन ठेवले टोक तुटता त्वरेने पकडून ठेवले तासुनी ब्लेडने पेन्सीलीस कैकदा टोकयंत्रात हलके फिरवून ठेवले संपता क्षुद्र साऱ्या भोगून वासना साबणाच्या जळी त्यां भिजवून ठेवले पुद्गलाचे सुबकसे नाजूक खेळणे खेळुनी खेळवूनी मांडून ठेवले आठवांच्या सुनेत्रा सायीस विरजुनी अर्थ लोण्याप्रमाणे कढवून ठेवले वृत्त – अभयकांती लगावली – गालगा/ गालगागा/गागाल/गालगा/
-
झुंजार – ZUNJAAR (MILITANT)
तरही लिहील्यावर कधीही भ्यायचे नाही श्रेयास दुसऱ्याच्या फुका लाटायचे नाही झुंजार ही मम लेखणी लढते पिशाच्चाशी खड्डा खणोनीया तिला गाडायचे नाही वय जाहल्यावरती जरा संयम असावा हो पचण्यास जे अवघड असे ते खायचे नाही तरही डिलीट करून व्हावे मोकळे वाटे ऐसे विकतचे दुःख मज ठेवायचे नाही धर्मास ऐश्या पाळणे ज्याची नशा सम्यक जगण्यात मिथ्यात्वा सुनेत्रा…
