Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • भावात देव आहे – BHAVAT DEV AHE (GOD RESIDES IN PURE DEVOTION)

    भावात देव आहे शोधा कुठे कपट ते आत्म्यास साक्ष ठेवा शोधा कपाट पट ते हिरव्यात कृष्ण धवला राखाडि लाल पिवळा चौकट बदाम किल्वर इस्पीक चार पट ते मम खेळ बिनपटाचा भासे जरी जनांना तत्त्वार्थ सूत्र खेळी जीवाजिवास पटते चाफ्यासमान सोने हळदीसमान औषध आराधनेत तपुनी होईल काळपट ते शेरात पाचव्या लिहितेय नाव माझे मांजापरी सुनेत्रा सत्यास…

    September 8, 2023
  • शुद्धोपयोग – SHUDDHOPAYOG (PURE STATE OF AWARENESS)

    शंका कशास कुठली निजभाव देव आहे शुद्धोपयोग जपणे ना देवघेव आहे पाऊल टाक पुढती रस्ता मिळेल सच्चा आत्म्यावरीच श्रद्धा कसले न भेव आहे चकली अनारशांचा दरवळ पिते रसोई रंगीत हे चिरोटे दुरडीत शेव आहे गाळून घाम जेव्हां होते कधी भुकेली रसनेंद्रियांस सुखवे तो शब्द जेव आहे जो तो जरी म्हणे मज ऐसीच तव तऱ्हा ही…

    September 1, 2023
  • शबाब – SHABAAB(YOUTHFULNESS)

    अंकात ना अडकते अक्षर शबाब होते मी आकडे न मोजे मौनी गुलाब होते कुठल्याच पुस्तकांचे माझे दुकान नाही माझी दुकानदारी माझा रुबाब होते अन्नास ठेव झाकुन होताच गार अलगद राहील ते टिकूनी ना ते खराब होते तो ब्रम्हदेश अस्सल माझाच वाटता मज चित्रात कृष्ण धवला रंगून बाब होते आहेच मी सुनेत्रा मम क्षात्रतेज तळपे मेयर…

    August 30, 2023
  • आलेख – ALEKH (GRAPH)

    चपला … पत्रामधले भाव अक्षरी जांभुळलेले मेघ जणु जलद गतीने झरे लेखणी चपला घेते वेग जणु मुसळधार पाऊस कोसळे घनमालेतुन परसात परिमल भिजल्या बकुळ तळीचा दूर पोचला शहरात कांदा … पाऊस उभा थरथरतो कोसळताना होत जांभळा सळसळतो कोसळताना कापता वीज कांद्यासम उलगडताना पापण्यांतुनी झरझरतो कोसळताना पेग… लाटांतुन उसळे भरतीचा आवेग अंबरी झळकतो बिजलीचाआलेख चल घेऊ…

    August 29, 2023
  • क्लास – CLASS

    हे घड्याळाचेच काटे सांगती काटे टोचरे काटे फुलांतिल काढती काटे हाच तो काटा उरातिल दरवळे घमघम अंतरीचे शल्य त्याच्या प्राशती काटे वाट काट्यांची जरी ही साधना आहे प्रीतिने जाळ्यांस विणती जोडती काटे त्या रुमालानेच बांधा तोंड पोत्याचे जे नको ते क्लास त्यांना टाळती काटे बांग ऐकुन कोंबड्याची जाग आल्यावर अक्षरांवर मम फराटे ओढती काटे कोणते…

    August 27, 2023
  • कुंदन – KUNDAN (PURE GOLD)

    संधीचे करते सोने.. शब्दांतुन झरते सोने … भावांनी मन भरल्यावर .. अंगांगी भरते सोने … गगन गिरीवर इंद्रधनू .. रंगी थरथरते सोने … अक्षर कुंदन माळ गळा.. मजला सावरते सोने … जांभुळ पेरुंच्या राशी .. गोडीत बहरते सोने … कुदळी खुरपी चालवता .. खोरी खरखरते सोने … गझल सुनेत्रा फुलदाणी  .. शेरात बहरते सोने …

    August 26, 2023
  • औक्षण – AUKSHAN (ATTRACTION)

    जपावी प्रीत संसारी फुका भणभण वणवण नको नको ते दागिने शेती तुझी आंदण नको जिवाला जीव देते हीच मम ओवाळणी नको ते मेणबत्त्या फुंकणे औक्षण नको कशाला दोष तव शोधून टिपणे रोजचे तुझी तू चूक पकडावी फुका भांडण नको गळावा लोभ रागी नाटकी वृत्तीतला मनाने शांत व्हावे भटकणे वणवण नको सुनेत्रा नाव माझे ठेवते स्मरणात…

    August 21, 2023
←Previous Page
1 … 53 54 55 56 57 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya