Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • निळा गारवा – NILA GARAVA(BLUE COOLNESS)

    मळलेल्या मम वाटेवरती मळता का हो जुन्या पुराण्या जखमांतुन भळभळता का हो शब्दांना तू पुद्गल म्हणुनी वापर मर्दा पूस जनांसी शब्द ऐकुनी चळता का हो बनी केतकी दाटुन येता गंध मृदेचा नागवेलिच्या पानांवर सळसळता का हो खोल डोह मन अथांग पाणी गडद काळिमा झऱ्याप्रमाणे नीरावर खळखळता का हो चमकायाचे नव्हते जर तर उगा फुका रे…

    August 4, 2023
  • जिवंत – JIVANT(ALIVE)

    प्रेम खेचण्या इतुकी ताकद सुरात माझ्या माझी नियती दवा जादुई करात माझ्या हवेत परिमल तरंगणारा लयीसवे मम बागडती पाखरे अंगणी घरात माझ्या असेल वेडा पीर कुणी तो नेक जाणता मोहरून थरथरतो भिजतो स्वरात माझ्या हरेक जीवांसाठी माझा जीव जागतो जिवंत स्वप्ने दिडदा दिडदा उरात माझ्या ताल गझलचा ठेका अनवट प्राण सुनेत्रा कळ मायेची बळ गरुडाचे…

    August 4, 2023
  • खलास – KHALAAS (OVER)

    खलास … मुक्तक खलास करते रण अतिरेकी डोके एखादे खलात कुटते चिकण सुपारी डोके एखादे गडे काफिया मुक्तकातला ओळख सुंदर रफार ई वर जणु वेलांटी डोके एखादे अलबेली … मुक्तक जशी टोकरी हवी हवेली हवी तशीच मैत्री मज अलबेली हवी कुसुमांकित तनु पर्ण चित्र पाऊस अशीच छत्री कवीस वेली हवी

    August 4, 2023
  • नंदनु – NANDNU (SON)

    अती लघुत्तम कथा नंगुडी दात्री पटवारी अतीव लटपट कलिके नंतर दाटी पळणारी असीम लवचिक कळा नंबरी दाई परदेशी अलगुज लटके कळ नंदीश्वर दामे पटणारी अविनाशी लय करात नंदनु दाजी परमोही अरुलता करी नंदादीपक दाखल परनारी अग्नी लवलव कशा नंदिनी दामाजी पवना अनवट लसती कट्यार नंगी दावत पथावरी अवचित लपुनी कचरा नंदा दाबे पटपट असली ललना…

    August 4, 2023
  • मोहरी – MOHAREE(MUSTARD)

    सुज्ञास सांगणे नलगे कर्मास लाभते  फळ गे मोकाट वाहती नळ गे धारेत गाडगे भर गे ज्ञानेश ग्यानबा ज्ञानी देतात प्यायला जल गे गागाल गालगा गागा लघु दोन गुरुसवे चल गे तेलात मोहरी खुलता गालात छानसे खळगे चल देव दर्शना जाऊ भक्तीत जोडण्या कर गे अंतरी झळकते सोने रत्नत्रय हृदयी धर गे

    July 26, 2023
  • धोंडा – DHONDAA( ADHIK SHRAVAN)

    साजिरें गोंडस… बाळ गणेश …. नाचे पदी बांधूनिया चाळ .. गणेश …. धृ. पद मावळात धूप पावसाचा खेळ… मुळा इंद्रायणी बेरजेचा मेळ .. पवनेच्या काठी… धोंडा श्रावणाचा ….. झाळ गणेश .. ढेकळे तापली रान धुमारले … कीड मारूनिया ऊन विसावले .. मृण्मयी करात .. धरी नांगराचा … फाळ गणेश … दिशा झुंजूमुंजू कुंकवात न्हाती ..…

    July 11, 2023
  • खरेदी – KHAREDEE(PURCHASE)

    असा मी असामी न कासव ससा मी कराया खरेदी उघडला कसा मी जपायास जीवा हिताचा वसा मी उठवते वहीवर मनाचा ठसा मी मनाला सुनेत्रा धुते खसखसा मी

    July 9, 2023
←Previous Page
1 … 55 56 57 58 59 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya