-
वर्ज्य ललित कथा आस्वादात्मक समीक्षा – VARJYA
‘ पिंछी कमंडलू ‘ या ग्रंथात धर्म आणि पंथ यासंबंधी आचार्यश्री विद्यानंद मुनी महाराज म्हणतात, “धर्म आणि पंथ यात मौलिक अंतर आहे. पंथ व्यक्तिवादी विचारधारेला उचलून धरतो. तो सत्यांशाला पूर्ण सत्य समजतो. धर्म वस्तुस्वभावाचे निरूपण करतो. तो त्रिकालाबाधित असतो. धर्म एकरूप असतो तर पंथ अनेकरूपी असतो. पंथ बाह्यगोष्टींवर भर देतो. मग एकाला उभा गंध चालत…
-
जाग ललित कथा -आस्वादात्मक समीक्षा – JAAG
जाग ललित कथा -आस्वादात्मक समीक्षा समकालीन मराठी जैन कथा चळवळ ही जैन समाजातील काही चळवळ्या(active) स्वभावाच्या लोकांनी ललित साहित्यावरील प्रेमापोटी सुरु केलेली चळवळ आहे. म्हणून या चळवळीतील साहित्यिकांची बांधिलकी फक्त साहित्य धर्माशीच आहे… साहित्य धर्माशी बांधिलकी असणारी व्यक्ती मग ती कुठल्याही धर्माची असो, जातीची असो, त्या व्यक्तीच्या लेखनात विशिष्ट धर्मानुयायांची जीवनपद्धती, त्यांचे उपास्य देवदेवता, पूजापद्धती…
-
देहबोली – DEH-BOLEE
निळा रंग आभाळाचा मनात जेव्हा उतरत जातो.. नयनांमधल्या निळ्या डोहात हळूहळू पसरत जातो पंख पसरून मुक्त पाखरे झेप घेतात नभात जेव्हा मन गाणे गात गात हिंदोळ्यावर झुलते तेव्हा हिंदोळ्यावर झुलता झुलता तरल होऊन शब्द काही नकळत अर्थ देऊन जाती देहबोलीला दिशात दाही डोळे बोलतात अधर विलगतात शब्दांमधला पकडून भाव तरल धुक्याच्या पडद्याआडून हाका मारतो अनाम…
-
रिक्त पिंजरा – RIKT PINJARAA
मनात सुंदर काही येता बिंब उमटते त्याचे नयनी .. नयन नीर जणु शांत जलाशय नैया फुलवारी तनु अवनी धुके मलमली लहरत झुलते अंगांगावर फुलवित काटे रिक्त पिंजरा मुक्त पक्षिणी इंद्रधनूवर निळसर गगनी
-
जन्मोत्सव – JANMOTSAV(आस्वादात्मक समीक्षा)
समकालीन मराठी जैन कथा चळवळीची विशिष्ट अशी विचारप्रणाली आणि भूमिका यांचे स्वरूप पुनीत या पहिल्याच कथासंग्रहात अगदी ठळकपणे स्पष्ट झाले आहे. पुनीत ते कथानुयोग असा सात संग्रहांचा हा ठेवा मराठी ललित साहित्यात जतन करून ठेवावा असाच आहे. कथा चळवळीतील अनेक ज्येष्ठ लेखक लेखिका, समीक्षक यांचे लेखन, मत मतांतरे, समीक्षात्मक लेखन पाहिल्यास या चळवळीमागील प्रेरणा, उद्दिष्ट…
-
कळस … आस्वादात्मक समीक्षा – KALAS
पुनीत या समकालीन मराठी जैन कथासंग्रहातील ‘ कळस ‘ या कथेचा काळ पाऊणशे ते शंभर वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ असावा. कथेला त्या वेळच्या महाराष्ट्रातील नांदणी, फलटण, नातेपुते, वाल्हे, दहिगाव या गावांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. श्रेणिक अन्नदाते हे कथालेखक असले तरी त्यांचा मूळ पिंड पत्रकारितेचा आहे. त्यांच्या लेखनाच्या प्रारंभीच्या काळात विविध…
-
श्रावण या ललित कथेचा पुराणकथेच्या आधारे तुलनात्मक अभ्यास – SHRAAVAN
श्रावण या ललित कथेचा पुराणकथेच्या आधारे तुलनात्मक अभ्यास ….. श्री सिद्धचक्र विधान मंडळाच्या संदर्भात आदर्श स्त्री पतिसेवा परायण मैनासुंदरीची एक कथा आपल्या जैन पुराणकथांमध्ये आहे. ही कथा काही जैन तत्वे वाचकांच्या मनावर बिंबवण्यासाठी एक सुंदर कथा आहे असे मानले जाते आणि तशी ती आहेच. ज्या काळात ती रचली गेली त्या काळात त्या काळच्या समाजाला ती…