Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • व्यापार – TRADE

    परवशता ना पाश माझ्या वसा गळा अंतरी देऊळी चित्रात साकार सावळा अंतरी काळ न भोंदू वेळकाढू निकाल सांगायला तो तर दावे कर्म वर्गणा जुन्या कळा अंतरी कशास फिरशी सांग बाई अश्या अवेळी कशी लहरत आहे काळ कर्दन रसा तळा अंतरी रंगांचा व्यापार क्षितिजी कळी फुले संगमी मंतरलेल्या चांदण्यांचा झुले मळा अंतरी गागागा गा गाल गागा…

    August 19, 2026
  • खट्याळ पोर – NAUGHTY GIRL

    खट्याळ अवखळ पोर बागडे घरात अवती भवती … पक्ष्यांच्या पंखांवर बसुनी उडते अवती भवती… मजेमजेचे खेळ बेरकी मुग्ध निरागस भाव … वृक्षांच्या राईत तिचा हा निसर्ग सुंदर गाव… गुणगुणते ती मनात रचते अर्थपूर्ण गाणे … वाऱ्यावरुनी वाहत येती तालांकित तराणे … सान गोडुली नात गोमटी खोड्या किती करते .. स्वतः स्वतःच्या रचून गोष्टी आम्हाला सांगते…

    August 17, 2026
  • सुपारी – BETEL NUT

    तुझी चूक तुजला कळाया हवी तुझ्या अंतरी सळसळाया हवी किती दिवस अजुनी तुझा घोळ हा तुझी जून वांच्छा जळाया हवी लवंगांत चिकनी सुपारी कळी तुझे पान ताजे वळाया हवी नयन नेत्र लोचन उमलण्या पुरी तुझा मान जपण्या तळाया हवी झरा निर्झराला मिळोनी नदी तुझ न गाव पण खळखळाया हवी

    August 12, 2026
  • आगगाडी – TRAIN

    वीरबाला रंगली रंगात सुंदर गा वीर हृदयी पद्म लेश्या सात सुंदर गा मोगऱ्याचा वेल आई मांडवी गगनी वीर भारी लेक माझी नात सुंदर गा ईश्वरी वरदान दंगल भावना जपते वीर गुंडे लेक माझे जात सुंदर गा केशरी धाग्यात पुष्पे गुंफली सारी वीर सैनिक पाच आम्ही हात सुंदर गा नाव आता ना लिहावे वाटते आहे वीर…

    August 11, 2026
  • मर्म – THE ESSENCE

    आचरणाने कर्म साधना स्वाध्यायाचे मर्म साधना धन्य धन्य ते मनन चिंतन लेखणीतून धर्म साधना झरझरत्या शब्दांतुन शोधन बोट ठेवण्या वर्म साधना ध्यानाग्नीने पाप जाळण्या तपवुन देहा नर्म साधना कष्टाची भाकरी खावया चुलीपुढे मम घर्म साधना नको नको ते तसले चष्मे करावयास अधर्म साधना जीटी बीटी मारायाला जागुन रात अकर्म साधना तारीख महिना अगले साल मायाजाली…

    August 10, 2026
  • दिडदा दिडदा – HEART BEATS

    दिडदा दिडदा सतार सुंदर मोक्षपथावर विहार सुंदर मधुर मधुर गातात अरण्ये घन आषाढी किनार सुंदर तार लाव वा अतार असुदे जिनभक्तीची बहार सुंदर कनक पाटल्या बिलवर तोडे रंग कंकणी अनार सुंदर छहढाली मम आत्महितास्तव फिरे लेखणी कट्यार सुंदर श्रीरंगाची काष्ठ बासुरी कुणास द्यावी उधार सुंदर नजर सुनेत्रा नासाग्री तव ध्यान समाधी तिहार सुंदर

    August 8, 2026
  • पाऊस गाणे – SONG OF RAIN

    निळ्या सावळ्या तळ्याच्या काठी पाऊस बघत उभे रहावे झरझरणाऱ्या धारांसंगे पाऊस गाणे गात रहावे कृष्ण धवल बदकांचे ढंग डोळे भरून पहात काठावरच्या वटवृक्षांचा चिंब कचभार उदवून द्यावा पिवळ्या फुलांच्या झुडुपामागे वाघोबाचा भास व्हावा असा पाऊस असे तळे स्मरणामध्ये साठवून घ्यावे कागदावरती चित्र रेखून त्यात सुंदर रंग भरावे

    August 5, 2026
←Previous Page
1 … 5 6 7 8 9 … 292
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya