-
हृदयाचा हिय्या – HRUDAYAACHAA HIYYAA
हृदयाचा हिय्या एक विशुद्ध भावकाव्य ….. कवी ग्रेस यांच्या बहुतांश कविता विशुद्ध भावकविताच आहेत. याबाबत म्हणजे विशुद्ध भाव काव्याबाबत कवी ग्रेस स्वतःच असे म्हणतातकी, “विशुद्ध कवितेचा मार्गच तर्काला तिलांजली देऊन तर्काच्या पलीकडून खुणावणाऱ्या नक्षत्र वाटांचा मागोवा घेत असतो. विशुद्ध भावकवितेतील तार्किक सुसंगती लय तत्वाच्या आधारे साधली जात असते. ती जीवशास्त्राच्या सेंद्रिय घटकांप्रमाणे विकसित होत असते,…
-
गोरज -GORAJ
कलंक नाही डाग न कसला हे तर हळदी कुंकू घन वर अभ्रांच्या गर्दीत अंबरी खग ताऱ्यांचे नाजुक झुंबर गुरे वासरे वाटेवरती गळ्यात मंजुळ घंटा किणकिण सांजेच्या केशरी करातिल झळाळणारे कंकण बिलवर पुष्पपऱ्यांचे रूप घेउनी सारवलेल्या अंगणातुनी निळ्या जांभळ्या बाळ पाहुण्या भूचंपा डोलती भुईवर हवेत गोरज लाल सावळा वडावरी पक्ष्यांचा कलरव शेणसड्यावर रांगोळीतुन गुलबक्षीची फुले तरूवर…
-
वाटे – VAATE
किती ग सुंदर चंद्रकळेवर हळद कुंकवाची बोटे किती ग काळी रात्र तरीही भय ना कसले मज वाटे किती ग चंचल हरिणी त्यांचे टपोर भिरभिरते डोळे किती ग छुमछुमणारे त्यांचे पैंजण पायीचे वाळे किती देखणी गुलाबदाणी घाटदार बांधेसूदही सुगंध भरली अत्तरदाणी हृदय जणू बन फुलवारी लाल गुलाबी रंग केशरी पश्चिम भाळी ल्यालेली बाग गुलाबांची पिवळ्या ग…
-
सोट – SOT
पदर रेशमी काठ जरी कसा आवरु घोळ जरी तिन्हीसांजेला पाझरती आठवणींचे लोट जरी शिकून घ्यावी मनभरणी भरले नाही पोट जरी हौस सदा मज लिहिण्याची लिहिते ठणके बोट जरी पुरे जाहले ना वाटे भरली आहे मोट जरी विकत आणते तिळगूळ ग जवळ दहाची नोट जरी खरे वागणे प्रिय प्रिय रे कुरवाळे मी खोट जरी गझल मौक्तिके…
-
बरकत – BARKAT
लुटेन संक्रांतीस गोडवा घरास माझ्या बरकत आहे हृदयसागराच्या धक्क्यावर सुख शांतीचे गलबत आहे मधुमेहाची कशास चिंता शरीर हलते चपळाईने वाळ्याचे माठात सुगंधी जांभुळ रसना सरबत आहे तिळातिळाने दिवस वाढुनी तिळातिळाने रात्र घटाया मावळतीचा सूर्य केशरी दिशेस उत्तर सरकत आहे कशास कोंडुन स्वतःस घेशी दगडी भिंतींआड पाखरा उघड उघड रे द्वार चंदनी दक्षिण वारा धडकत आहे…
-
ट्राम – TRAAM
ऊन सावली हिरवाळीवर लोळत आहे रम्य हवेलीच्या छपरावर नाचत आहे वळणा वळणाच्या वाटेवर वळसे घेण्या झुकझुकणारी ट्राम विजेवर धावत आहे वृक्ष तरूंच्या पानांवरती झाक पोपटी तिथे तरुतळी मुग्ध बालिका खेळत आहे मधुर सुवासिक दरवळणारा आंबेमोहर आंबेराई कंच पाचुसम डोलत आहे धूत धवल पाकळ्या जुईच्या त्यावर मोहक कुशल सुनेत्रा कशिदा नाजुक रेखत आहे
-
गॅलरी – GALAREE(GALLERY)
काल मी लिहिलेच नाही वासरीत काही विसरले करण्यास नोंदी डायरीत काही पसरले कडधान्य देण्या ऊन छान वारा पाखरे आलीत टिपण्या ओसरीत काही कोसळे पाऊस धो धो अंगणात दोरी घातले सुकण्यास कपडे गॅलरीत काही आज मी गाऊन भरते ओंजळीत गाणे शोधुनी हुंकार अडले पावरीत काही माझिया ओठात येता बहर गालगागा कागदावर उतर गझले सावरीत काही