-
चंद्रार्क तनु – CHANDRAARK TANU (MOON BEAM )
जिनसूर्य तू जिनचंद्र तू जिनबिंब तू मम अंतरीच्या भावरंगी चिंब तू मी मोजते ना बीजपंक्ती अर्थदा आरक्तवर्णी फाकले डाळिंब तू उत्सर्पिणी अवसर्पिणी काळातल्या चंद्रार्क तनुवर सिद्धस्वरुपी टिंब तू नांदावया अंकांसवे स्वर अक्षरे काट्यांत मी जो नेसले तो लिंब तू दाटून अंतर गीत झरता भावना ग्रंथीत उरले बीजरूपी डिंब तू वाळून जाता शाकभाज्या माळवी घोळून तिखटी…
-
मर्गळ – MARGAL (TIREDNESS)
घरी वावरे रस्त्यावरची वर्दळ जेंव्हा मुकीमुकी परसामध्ये राबत बसते मर्गळ तेंव्हा मुकीमुकी कोरांटीचे कुंपण हिरवे नाजुकसाजुक सान कळ्या आठवते मज सावलीतली कर्दळ केंव्हा मुकीमुकी … गडद निळाई वाकुन बघते हौदामधल्या जळी पेंगुळलेली रातराणी गोकर्णीसम निळी अश्या अवेळी निळ्या घनातुन बरसे जेंव्हा धार जळात उठती थेंबांभवती वलये गोलाकार … अती लघुत्तम कथेस म्हणती अलक बरे अश्या…
-
साकी – SAAKEE ( CUP BEARER)
चहूकडे चाललीय घाई सुधारण्याची स्वतःस आता कुणी न बघते कसे फुलांच्या जपायचेरे मनास आता अता सुखाने लिहीत आहे असेच काही मने फुलाया खुडून काटे म्हणेन हृदया उधळ उधळ तू सुवास आता जुनाट कर्मावरी उतारा मलाच देते जहाल साकी तयांस प्राशुन झरझर लिहिते मुळी न थारा भयास आता भिजून भिंती दवारल्यावर जुने नवे पोपडे निघाले करुन…
