-
टिटवी – TITAVEE (PLOVER)
भाग्य लिहाया भाळावरती कधी न येते सटवी बिटवी उडता उडता हेच सांगते टिवटिवणारी टिटवी बिटवी मकर संक्रमण सणास कोणी जित्राबांना हाकत येता किराण्यातले वाण लुटूनी अंधाराला पटवी बिटवी नको जीम अन नकोच डायट कामे करते मस्त जेवते रहाट ओढून पाणी भरते वजन बरोबर घटवी बिटवी फटाकडी ना बॉम्ब फटाका वाहन भारी तयात बसुनी मजेत सारी…
-
पोपडे – POPADE (FLAKES)
चहूकडे चाललीय घाई सुधारण्याची स्वतःस आता तयां अता लागले कळाया कसे जपावे फुलास आता अता सुखाने लिहीत आहे असेच काही मने फुलाया खुडून काटे म्हणेन हृदया उधळ उधळ रे सुवास आता जुनाट कर्मांवरी उतारा मलाच पाजे जहाल साकी तयास प्राशुन झरझर लिहिते मुळी न थारा भयास आता भिजून भिंती दवारल्यावर जुने नवे पोपडे निघाले करुन…
-
ललकारी – LALKAAREE
कशी निवडून घ्यावी नोकरी मी छान सरकारी मला रे मूड कोठे आजही देण्यास ललकारी मुलांना पाहुनी आता शिकाया नियम सृष्टीचे घराच्या परसदारी अंगणी लावेन तरकारी करांनी कैक लिहिता उमटल्या गझला करामत ही पुरे चर्चा कराला कोठल्या म्हणतात अबकारी झळांनी पेटणे नाही हिमाने गोठणे नाही जिवाने कोष विणणे ते नसावे त्यास भयकारी लिहावे नाव म्हणते कोरुनी…
-
सम्मेदशिखरजी -SAMMED SHIKHARJEE (PARASNATH HILL THE MOST SACRED TIRTHA FOR JAINS )
तीर्थंकर जिन वीस नाथ जिन मोक्षाला गेले सम्मेदशिखरजीवरून सारे मोक्षाला गेले वीस जिनांना मी माझ्या या कवणी गुंफियले … ध्रु पद अजित संभव अभिनंदन जिन सुमति पद्म सुपार्श्व चंद्र जिन .. इथे सिद्ध जाहले वीस जिनांना मी माझ्या या कवणी गुंफियले … १ पुष्पदंत शीतल श्रेयांस अन विमल अनंत धर्म शांति जिन.. इथे मुक्त जाहले…
