-
गझल गाज – GHAZAL GAAZ
रथास अश्व सात जोडलेत तयात सूर्यदेव बैसलेत समुद्र कुंचल्यास फिरवतोय निळ्या नभास स्वर्ण वर्ण देत उधाणलेय नीर तप्त लाट नमेन त्यास ओंजळीत घेत निसर्ग धुंद रंग उधळतोय सुगंध लहर दौडते हवेत निवांत ऐक गीत गझल गाज प्रसन्न ऊन्ह कोवळे नि रेत गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १६) लगावली – लगाल/गाल/गाल/गाल/गाल/
-
इंद्रधनुष्य – INDRA-DHANUSHYA
इंद्रधनुष्य हा शब्द गुंफलेले वेगवेगळ्या वृत्तातील सात शेर(मतल्याचे) इंद्रधनुष्यातील रंग मी पेरित गेले मातीत उगवुन आले रंगीत हात विणण्या झेले मातीत क्षितिजावर ये इंद्रधनुष्या बसेन तुझिया पंखांवरती सप्तसुरांचे धागे जोडत झुलेन तुझिया पंखांवरती इंद्रधनुष्या दे तव मजला रंग उधळण्या देइन मी तुज गझलेमधले ढंग उधळण्या मृगजळ आणिक इंद्रधनुष्याला मी केव्हा माया म्हटले होते कलम जादुई…
-
पंचकर्म – PANCHAKARM
पंचकर्म आयुर्वेदातिल खूप लाभकारी बस्तीसाठी साजुक आहे तूप लाभकारी अभ्यंगाने स्नेहन करुनी पूर्ण शरीराचे वाफ दिली जर कायेला तर रूप लाभकारी भाळ शिरावर धार औषधी तेल नि काढ्याची जणू मनाला शांत कराया भूप लाभकारी उदवर्तन अन नस्य करावे गरज असे तेव्हा जसे कीटकां पळवायाला धूप लाभकारी हवा अन्न पाणी निर्जंतुक मिळण्या जीवांना डोंगर निर्झर शुद्ध…
-
घंगाळ – GHANGAAL
दुःखद आहे टाळ तिला अशक्य मग खंगाळ तिला निजण्या दे भूमीची चटई पांघरण्या आभाळ तिला ओंगळवाणी दिसली जर तर नको म्हणू वंगाळ तिला दाभण घेवुन उसवायाचे प्रश्नांचे जंजाळ तिला फुटका गळका जुनाट टब तो स्नाना दे घंगाळ तिला
-
वेताळ – VETAAL
कसे जायचे सागराच्या तळाला पुसे मीन सैलावलेल्या गळाला तळी सागराच्या किती मीन मोती नवा प्रश्न वेताळ पुसतो जळाला गिळुन मीन किल्ली बसे जी बुडाली तुझ्या लेखणीने उघड तूच टाळा विकायास मासे जरी जायचे तुज कपाळी टिळा अन गळा घाल माळा म्हणे मत्स्यकन्या मला ही हवा रे खऱ्या सोनियाचाच पायात वाळा गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २०) लगावली…
-
माय चंदनी – MAAY CHANDANEE
आभाळातिल सजल घनांची भाऊबीज ओवाळी जलदांस अंबरी ताई वीज धारारूपी गझलेचे उलगडण्या राज वाटिकेत फुलवून पिसारा मयुरा भीज जरी रिक्त जाहलेत बरसुन अक्षर मेघ भरुन पावती पण त्यागाचे होता चीज इंच इंच लढवाया डोंगर काव्यगंगे माय चंदनी खोड होउनी सोसू झीज स्वातंत्र्यातिल झोप सुखे घेण्यास भावा झऱ्याकाठच्या सारवलेल्या कुटीत नीज गझल मात्रावृत्त (२३ मात्रा)
-
फळी – FALHEE
दीपावली दीपावली दीपातळी दीपावली आली दिवे लावावया दीपा कळी दीपावली नामासवे नावेपरी दीपा जळी दीपावली गालावरी दोन्ही पडे दीपा खळी दीपावली चाफा फुले गाण्यातुनी दीपा दळी दीपावली सवती जरी हा काफिया दीपा फळी दीपावली सोन्यापरी आहे खरी दीपा सळी दीपावली