Tag: Chaarolee

  • निर्मल – NIRMAL

    मी लिहीत आहे मुक्तक गझला गाणी झुळझुळते गाते त्यातील निळसर पाणी पाण्यावर डुलते एक कागदी नाव गाठण्या स्वप्नीचे निर्मल सुंदर गाव

  • सोय – SOY

    मौन जपे मी काव्यामध्ये जरी भासले तेव्हा कोणा मरगळल्यासारखी मॅड मला घनचक्कर म्हणता शब्दकळा गोठवीत गेले साकळल्यासारखी शब्दकळेला वा भावांना स्वतःच सुंदर कुरुप बनविता पाहुन अपुली सोय साधे सोपे नियम पाळण्या घडीत नाही नाही म्हणता घडीत म्हणता होय

  • झबक बाई – ZABAK BAAEE

    सत्ताविस मात्रात बांधली सुबक रुबाई खास पूजन करण्या मीच सजविले तबक रुबाई खास ब्रह्मांडातिल जीवजीवांना हिचेच वेड नि ध्यास सृष्टि सुनेत्रा सुंदर बाई झबक रुबाई खास

  • वारा चंचल – VAARAA CHANCHAL

    शिशिराच्या पाचोळ्यातिल मज अक्षर अक्षर हाक मारते निरोप घेण्या वाज वाजते वसंत वाऱ्यावरती झुलते पीत पोपटी मृदु पर्णांकुर पाहुन सृष्टी हात जोडते किरण कोवळे चराचरावर मोद सांडता हृदय डोलते … पानांच्या जाळीतुन उतरे ऊन खोडकर हळदी तरुतळ मृदा तळीची उडत राहते वारा चंचल ऊन न चंचल गतकाळाच्या आठवणीतिल पिसे लहरती वाऱ्यावरती संधिकाल की उषाकाल हा…

  • आत्महितैषि – AATM HITAISHEE

    … गागाल गागाल हे अखरब साठी सुरुवातीला सोपे लिहुया अवघड ना गण गागालगा गागागा हे अखरम साठी आरंभाला गाललगा च्या सारखेच हे ग ललगागा … आत्महितैषि बरसावे मी श्रावणातल्या ढगासमान रिते रिते मी व्हावे उडण्या खगासमान प्रेम वसे मम हृदयी सम्यक आत्महितैषि जन रीती पण पाळाव्या मी जगासमान

  • नाताळ – NAATAAL

    नाताळ घेऊनी आलाय भेटी कोण सांगा घेऊनी भेटींस गोष्टी दोन सांगा गोडवा नात्यात आणे काव्य माझे गातसे नाताळ गाणे रम्य माझे … तराई मम् रुबाईत मीच लिहिले “बोल” गझले मम तराईत मीच दडले बोल गझले भावलिंगी मुनी दिगंबर आत्मधर्मी मम शिलाईत मीच विणले “बोल” गझले … सगाई अखरम वा अखरब असुदे तव वृत्त रुबाई मतला…

  • पाऊले – PAAOOLE

    पाऊले वाळवंटी चालती ही पाऊले सामान अपुले वाहती ही पाऊले हे निळे आभाळ वरती दाटुनी यावे कधी भिजविण्या रेती तळीची गावे कधी ….. नित्य लिहावे काहीतरी मी मला जिंकण्यासाठी मला जिंकुनी मीच लिहावे मला हरवण्यासाठी शब्दांमधुनी मोद उधळते भूवर साऱ्या वरती जाते कधी कधी मी गगन चुंबण्यासाठी