Tag: Chaarolee

  • जय जया जय – JAY JAYAA JAY

    जय जया जय जयघोषाने जय ना होय कधी हर्ष हर्ष हा शब्द जपत रे हर्ष न होय कधी हर्ष व्हावया विजयी व्हाया जप तू प्रीतीला खऱ्या खऱ्या भावना रांगड्या उतरव लढतीला

  • स्वप्न देखणे – SWAPN DEKHANE (handsome dream)

    सौधावरती उभे राहुनी पहात राहू स्वप्न  देखणे झाडावरती महाल अपुला निवांत गाऊ गीत साजणे हवेत उडते विमान सुंदर खरी कराया सजग कहाणी हात असूदे हातामध्ये नको गोठणे नको तापणे

  • विद्युल्लता – VIDYULLATAA (a bright flash of lightning)

    नेत्र मिटता राधिकेचे श्याम बघण्या अंतरी मेघ झुकती अंबरीचे वर्षण्या मातीवरी पकडण्या वाऱ्यास वेड्या नाचुनी विद्युल्लता हात धरता वारियाचा कोसळे धरणीवरी वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.

  • इंजिन – (mover)

    आगगाडीचे इंजिन धावे रुळावरुनि या डौलाने मोहक वळणे पार कराया सहज लीलया वेगाने निळ्या अंबरी शुभ्र घनांची माळ फिरे बघ स्वैर पणे झुकझुक झुकझुक नाद जागवी मनी-मानसी गीत जुने

  • सांज सावळी – SANJ SAVALI (dusky evening)

    स्वमग्न नाही आत्ममग्न मी काव्यामध्ये स्वात्ममग्न मी सांज सावळी ध्यानमग्न जणु कधी कधी परमात्ममग्न मी

  • पहाट गाणे – PAHAT GANE (song of dawn)

    भाळावरी नभाच्या, पूर्वेस चंद्रकोर; जाळीतुनी ढगांच्या, हसते सकाळ भोर. गाई भारद्वाज, त्याचे पहाट गाणे; फुलली प्रभात हसरी, नाचे मनात मोर.. चारोळी-मात्रा,तेवीस(२३)

  • सुंदरी – SUNDAREE (A BEAUTIFUL WOMAN)

    In this muktak the poetess says, ‘A beautiful woman knows her own beauty. She doesn’t need any mirror to know the power of her beauty.’ मी कशाला पाणियात पाहू गं चोरुनीया आरशास फोडू गं सुंदरी ही जाणते गं आत्म्यास देह चारू डौलदार तारू गं