Tag: Chaarolee

  • शब्दखेळ – SHABD KHEL (WORD PLAY NEW WITH OLD)

    शब्दखेळ मी रोज मांडते नवा जुना शब्दमेळ अन ओज सांडते नवा जुना नित्य डोलते भार पेलण्या जगावया शब्दकेळ ना बोज कांडते नवा जुना

  • गोडवा – GODVAA (SWEETNESS)

    मी मौनाशी मैत्री केली मौनातच मम आरोळी शब्दांसंगे खेळ कागदी भरते कर्मांची झोळी अधरांवर तर्जनी न नाचे साक्षीभावे अचल उभी मकरंदी गोडवा गुळाचा निर्जरेस नव चारोळी

  • पळस -PALAS (FLAME OF THE FOREST)

    पळस … जरी पुजसी जगव अंगणी तुळस माणसा सम्यकदर्शन-ज्ञान-शीलयुत पळस माणसा ओक मनातिल किळस साठली स्वतःसमोरी चढव स्वतः तू आत्ममंदिरी कळस माणसा ……. कुंतल बट कळी मुग्ध अन अर्धस्फुट ही हळद केशरी कुंकुम घट ही उमल उमल तू कलिके म्हणते भाळावरची कुंतल बट ही …….

  • जगत – JAGAT (THE WORLD)

    मी गुणगुणते जे गाणे आहे माझे माझ्यातुन उमले ते ते सारे माझे मी माझे माझे म्हणत राहिले जेव्हा पाहिले जगत मी अवती भवती तेव्हा

  • निर्मल – NIRMAL

    मी लिहीत आहे मुक्तक गझला गाणी झुळझुळते गाते त्यातील निळसर पाणी पाण्यावर डुलते एक कागदी नाव गाठण्या स्वप्नीचे निर्मल सुंदर गाव

  • सोय – SOY (CONVENIENCE)

    मौन जपे मी काव्यामध्ये जरी भासले तेव्हा कोणा मरगळल्यासारखी मॅड मला घनचक्कर म्हणता शब्दकळा गोठवीत गेले साकळल्यासारखी शब्दकळेला वा भावांना स्वतःच सुंदर कुरुप बनविता पाहुन अपुली सोय साधे सोपे नियम पाळण्या घडीत नाही नाही म्हणता घडीत म्हणता होय

  • झबक – ZABAK (RACEME)

    सत्ताविस मात्रात बांधली सुबक रुबाई खास पूजन करण्या मीच सजविले तबक रुबाई खास ब्रह्मांडातिल जीवजीवांना हिचेच वेड नि ध्यास सृष्टि सुनेत्रा सुंदर बाई झबक रुबाई खास