-
शीळ – SHEEL
श्रावणातलया नीळ घनातिल रिमझिम जल बरसे सहज सुटोनी पीळ मनातिल रिमझिम जल बरसे मोरपिसारा फुलवुन नाचे मयुर गवतावरी पडता कानी शीळ बनातिल रिमझिम जल बरसे
-
मुहूर्त – MUHOORAT
बोलायाचे लिहावयाचे मुहूर्त ठरवे कोणी पोळी भाजी सुद्धा भरवे चमच्याने कोणी नजर सांगते नकोच चमचा अधर घट्ट मिटले उघड पाकळ्या सोड मौन तू अता तरी गझले
-
इडली डोसा – IDALEE DOSAA
इडली डोसा खमंग आप्पे अथवा सुरळी वड्या नको दाखवुस लालुच असली उघड आतल्या कड्या मनीमाऊला चीज हवे रे तेही ताजे ताजे नकोच उंदिर सोडच त्याला पीसी च्या मागे
-
जय जया जय – JAY JAYAA JAY
जय जया जय जयघोषाने जय ना होय कधी हर्ष हर्ष हा शब्द जपत रे हर्ष न होय कधी हर्ष व्हावया विजयी व्हाया जप तू प्रीतीला खऱ्या खऱ्या भावना रांगड्या उतरव लढतीला
-
स्वप्न देखणे – SWAPN DEKHANE
सौधावरती उभे राहुनी पहात राहू स्वप्न देखणे झाडावरती महाल अपुला निवांत गाऊ गीत साजणे हवेत उडते विमान सुंदर खरी कराया सजग कहाणी हात असूदे हातामध्ये नको गोठणे नको तापणे
-
विद्युल्लता – VIDYULLATAA
नेत्र मिटता राधिकेचे श्याम बघण्या अंतरी मेघ झुकती अंबरीचे वर्षण्या मातीवरी पकडण्या वाऱ्यास वेड्या नाचुनी विद्युल्लता हात धरता वारियाचा कोसळे धरणीवरी वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.
-
इंजिन – INGIN
आगगाडीचे इंजिन धावे रुळावरुनि या डौलाने मोहक वळणे पार कराया सहज लीलया वेगाने निळ्या अंबरी शुभ्र घनांची माळ फिरे बघ स्वैर पणे झुकझुक झुकझुक नाद जागवी मनी-मानसी गीत जुने