Tag: Ghazal in akshargan vrutta

  • रत्न – RATN

    जसे रत्न कन्या तसे पुत्र सुद्धा जशी माय कारण तसा बाप सुद्धा जसा गाळ साठे तसे पात्र बनते जसा लेक कडवा तशी लेक सुद्धा जरी कायद्याने तुला हक्क मिळतो जशी लेक गिळते तसा लेक सुद्धा जसा हात मारू तसे द्रव्य वाहे जशी पुण्य धारा तसे नीर सुद्धा जसा एक आत्मा तसे कैक आत्मे जशी मी…

  • भवंदाज – BHAVANDAJ

    दर्पणी माझिया मौन अंदाज तू लक्ष्य भेदून जाई तिरंदाज तू स्वच्छ ऐन्यामधे बिंब तव श्रीमती आरसा नीर वारा घरंदाज तू शांतता चारुता चंद्रमा अंबरी त्याग मिथ्यात्व अन घे भवंदाज तू डाव दांडू चिनी भारती इंग्रजी उडव तू झेल तू हो गुलंदाज तू मार चौकार रे सा लिही गावया ठोक छक्का सुनेत्रा फलंदाज तू

  • माला -MALA

    हात देण्या नेक ताली राहण्या त्यागिली मी ती रुदाली राहण्या सूर ठेका लय स्वराची साधना गालगागा गा गझाली राहण्या शांत जागा अंतराळी शोधली मौन कर्तव्ये खयाली राहण्या शांतता आत्म्यात माझ्या नांदते निवडली ऐसी प्रणाली राहण्या सत्य मी जाणे सुनेत्रा जाणती माळ माला माल माली राहण्या

  • भोवरा – BHOVARA

    अधीर मस्त नाचरा समीर मस्त नाचरा ..जमीन मतला अमीर मस्त नाचरा तरंग मस्त नाचरा … हुसने मतला उलगडुनी दले झुले गुलाब मस्त नाचरा बनात शीळ घुमवितो कबीर मस्त नाचरा उन्हात मेघ वर्षला सुशांत मस्त नाचरा नदीत भोवरा गळा जळात भृंग नाचरा उधाणता हवा तळी समुद्र मस्त नाचरा

  • शिखर – SHIKHAR

    नवनितास कढव खास कुबट वाद मिटव खास….(जमीन मतला) त्या वळ्यास घडव खास गाजतेय गाज खास… (हुस्ने मतला, स्वर काफिया) आम आदमी असून एक बनव दार खास पेन्सिलीतल्या शिशास लीड नाव खास खास इंग्रजीत लीड घेत रोख तो लिलाव खास शीक नीट बोलण्यास लायकी कळेल खास सोक्षमोक्ष लावताच बांगड्या भरेन खास मूर्त मखर नीव शिखर सोनियात…

  • कार्यकारणभाव – KARY KARAN BHAV

    कार्यकारण भाव जाणू सृष्टिचे विज्ञान जाणू रोखण्यास्तव कर्मबंधन संवराचे कार्य जाणू जीव पुद्गल वेगळेपण अंतरी ध्यानात जाणू निर्जरेच्या साधनेला तपवुनी देहास जाणू धर्म जीवांचा अहिंसा हे सुनेत्रा सत्य जाणू

  • कामशेत – KAMSHET

    नगर ग्राम शेत छान रे गाळ घाम शेत छान रे (जमीन मतला ) धरण पानशेत छान रे काळ काम शेत छान रे (हुस्ने मतला) धाम कामशेत गावकी वेळ दाम शेत छान रे एकसाथ राबतात दो डाव वाम शेत छान रे रे त अर्थ शोधला बरा साम पाम शेत छान रे अश्व वेग घोडदौड तव कृष्ण…