आकडे मोजून थकवे सहज कोणी
मांजरांना काय शिकवे सहज कोणी
उजळणी पुन्हा कराया वर्तमानी
भूतकाळा देय लकवे सहज कोणी
वट तुझा काहून फिक्का वाटला रे
वटवटीने चित्त पकवे सहज कोणी
काळ गेला काळ आला काळ येई
शीतकाली आम्र पिकवे सहज कोणी
आरतोळीतील विझते ज्योत जेंव्हा
पेटवूनी तीस झुकवे सहज कोणी
मार्गदर्शक दगड मैलाचे बनाया
जाहले आहेत चकवे सहज कोणी
शेर मक्त्याचा “सुनेत्रा” अर्थ आहे
बदलुनी संदर्भ चुकवे सहज कोणी
शब्दार्थ
आरतोळी .. करवलीच्या हातात असलेले दोन आरत्या असलेले तबक
तीस ..तिला , तिजला