-
प्राणी – PRANI(ANIMALS)
आषाढ संपला ना आहे अजून बाकी येणार श्रावणाची धारा स्मरून बाकी कोणास वेध लागे गोणी भरावयाचा करण्या वसूल मरमर ठोके धरून बाकी अंदाज हावऱ्यांचे भोगात साठलेले कर्मे कुटील नीती दारी सजून बाकी निंदा टवाळ खोरी खात्यात परतलेली चोरी कशाकशाची बघ आठवून बाकी कल्याण तव कराया बसलेत दोन प्राणी लावून पाय पळ तू विसरून धून बाकी
-
स्वतः – SWATHA(MYSELF)
-
दूत- DUT(MESSANGER)
आषाढ योग वर्षा मेघांत दूत आहे क्षितिजावरून येतो जलदांत दूत आहे काव्यातल्या स्मृतींनी बघ प्रीत रंगलेली मम प्राण सांगतो मज प्राणांत दूत आहे नक्षत्र श्रवण आहे पंचांग एक लिहिते बांधीव सन्मतीच्या अंकांत दूत आहे गुंफीत अक्षरांचे सूत्रात लक्ष मोती येई अवस दिव्यांची दीपांत दूत आहे नुरली मनात शंका शंखास फुंक वाऱ्या धर ओंजळी सुनेत्रा हातांत…
-
संवेदनशिल – SANVEDANSHIL(SENSITIVE)
ना विनोदी ना निगोदी नात माझी संवेदनशिल आळशी ना बावळी ना जात माझी संवेदनशिल मी न मिथ्या रीत सांगे आत्मघाती जाचणारी मूळ फांद्या पुष्प बीजे पात माझी संवेदनशिल काय सांगू अंद्धश्रद्धा पोसलेल्या मानवांनी टाकते जीवांस जपण्या कात माझी संवेदनशिल नित्य स्वाध्यायातुनी मी जाणले रे स्वरुप आत्म्या लेकरे तत्वार्थसूत्री सात माझी संवेदनशिल भजन कीर्तन विठ्ठलाचे पांडुरंगाची…
-
हाळी – HAALHEE(A LOUD CALL)
-
प्रांत – PRAANT(PROVINCE)
-
कोंबडे – KOMBADE(ROOSTERS)