-
हेड – HEAD(HED)
हे राजगुरुचे गाव सुद्धा खेड आहे मम गझल बंधन जीव जपण्या थ्रेड आहे असुदेत रे तव कातडीचा रंग काळा पण रंग रक्ताचा तुझ्याही रेड आहे हातात असुदे लेखणी तलवार जणु रे आपण अता दावूच त्यांना आपली ए ग्रेड आहे ब्रम्हांड पुरवी बालकांना माझिया जी अदृश्य शक्तीची सुरक्षा झेड आहे मम मान सुंदर मोरणीची शोभते मज…
-
उपचार – UPCHAR
कीड नडली पुन्हा बहर नडले कुठे पूर्ण उमलूनही पुष्प खुडले कुठे लाल अंगांग झाले रगडले कुठे चोर रंगेल हाती पकडले कुठे हा उन्हाळा नव्हे पावसाळा नव्हे नीर सांडे तरी भाव रडले कुठे मत्स्य भरतीतले रास जाळ्यामधे तप्त वाळूत मीन तडफडले कुठे कर्म प्राचीन जर धर्म संयम हवा कैक उपचार पण रोग झडले कुठे वीज नाचूनही…
-
राजधानी – RAJDHANI
पंकात वासनेच्या रुतले कधीच नाही कमळातले अली पण डसले कधीच नाही चढवून चिलखताला चिखलात खोल गेले तेथे निवास करणे रुचले कधीच नाही रंगून राजधानी सुकुमार भावनांची व्यापार त्यात करुनी फसले कधीच नाही घोटून अक्षरांना केली अशी करामत ठिणग्या करात फुलल्या विझले कधीच नाही तपवून पाप गेले देऊन पुण्य आले भिजले कृतज्ञ भावे रुसले कधीच नाही…
-
पारणे – PAARANE
हरित कंच अक्षरे शुभ शुभ शुद्धमती सिद्ध लाल जाहले शुभ शुभ शुद्धमती ओठ अचल बोलती भाळावर बिंदू नेत्र भाव बोलके शुभ शुभ शुद्धमती ललल गाल गालगा गागागागागा अहं सोड माळणे शुभ शुभ शुद्धमती जलद कृष्ण वर्षती गडगडती गगनी करूयात पारणे शुभ शुभ शुद्धमती बिंब आपले खरे आत्मस्वरुप आहे त्यांस आत पाहणे शुभ शुभ शुद्धमती
-
बहिणी – BAHINEE
बहिणी खरेच सच्च्या भावांस जागणाऱ्या लावून अर्थ हितकर नावांस जागणाऱ्या जेथे न फक्त चर्चा चारित्र्य पूजिती त्या ओढाळ अंतरीच्या गावांस जागणाऱ्या मांडून चूल दगडी मी भाकऱ्यांस थापे घन तापल्या तव्यांच्या तावांस जागणाऱ्या जे घाव तू दिले मज भरुनी तयांत सौरभ फुलती कळ्या सुगंधी घावांस जागणाऱ्या जिंकावयास हृदये उधळू सयी सुनेत्रा मागून घेतलेल्या डावांस जागणाऱ्या
-
पट – PAT
भावात देव आहे शोधा कुठे कपट ते आत्म्यास साक्ष ठेवा शोधा कपाट पट ते हिरव्यात कृष्ण धवला राखाडि लाल पिवळा चौकट बदाम किल्वर इस्पीक चार पट ते मम खेळ बिनपटाचा भासे जरी जनांना तत्त्वार्थ सूत्र खेळी जीवाजिवास पटते चाफ्यासमान सोने हळदीसमान औषध आराधनेत तपुनी होईल काळपट ते शेरात पाचव्या लिहितेय नाव माझे मांजापरी सुनेत्रा सत्यास…
-
जेव – JEV
शंका कशास कुठली निजभाव देव आहे शुद्धोपयोग जपणे ना देवघेव आहे पाऊल टाक पुढती रस्ता मिळेल सच्चा आत्म्यावरीच श्रद्धा कसले न भेव आहे चकली अनारशांचा दरवळ पिते रसोई रंगीत हे चिरोटे दुरडीत शेव आहे गाळून घाम जेव्हां होते कधी भुकेली रसनेंद्रियांस सुखवे तो शब्द जेव आहे जो तो जरी म्हणे मज ऐसीच तव तऱ्हा ही…