-
पटोला – PATOLAA
अबोली पटोला भरजरी पटोला नवलखे अलिकुले किनारी पटोला न घोला न अंचल निळाई पटोला गझल गझलियत स्वर जपावी पटोला गडद कुंकवासम शबाबी पटोला सळसळे शिवारी बहारी पटोला कनक जोडव्यांची नव्हाळी पटोला उन्हाळी फुलांची हळदुली पटोला हरित पल्लवीची मखमली पटोला निसुन्दी मनावर मुरुकुला पटोला न विंजन न वारा भरारी पटोला तराया तरोहण तराफी पटोला स्वरूनादबिंदे समाही…
-
अणू – ANOO
तुझी वासना ठेव तुज जवळ तू निजी कामना भावना कवळ तू कराया निवाडा स्वतः साक्ष हो जुनी जीर्ण वस्त्रे पुरी सवळ तू न कोप करता शिकत जावे बरे उन्हाने तपव देह मथ खवळ तू कळाया तुला सर्व पर मोह तो उकळ मौन द्रव्ये तळा ढवळ तू गुरा वासरांना चरायास ने बसूनी दुपारी चऱ्हाट वळ तू…
-
नोंदणी – NONDANI
विसरतेस जेव्हा कधी ओढणी तू रुमालास करतेस जल गाळणी तू पुरे जाहल्या चौकशा पोलिसी रे तपासून घ्यावी प्रुफे नोंदणी तू जुन्या पुस्तकांना पुन्हा चाळ थोडे कळायास संदर्भ झटक मांडणी तू घरातील खोल्या कवाडे किती ते जरा लक्ष घालून खडा हो झणी तू सुनेत्रा तुझे दोष गुण ओळखूनी स्वतः हो स्वतःची खरी चाळणी तू
-
थेअरी – THEARI
झाड पाला पार होता पाळली शेळी आम्ही पान विकण्या शायरांना बसवले ठेली आम्ही थेअरी ना वाचली प्रात्यक्षिके केली आम्ही भावना घाण्यात गाळुन जाहलो तेली आम्ही ढेप होती आणलेली स्वस्त बाजारातूनी कवठ पिकले तोडुनीया बनवली जेली आम्ही गुरगुऱ्या वाघांस पकडुन कोंडुनी काऱ्यात सहज घोकुनी शेरास सव्वा झोपतो डेली आम्ही मूळ कारण काय ते ठाऊक त्यांना म्हणती…
-
खेच – KHECH
जगण्यात टेच आहे सुंदर खरेच आहे लक्ष्यास बाण भेदे धनुरात खेच आहे प्राजक्त बकुळ पुष्पे लक्षात वेच आहे करुनी फुकाच घाई चुकल्यासम ठेच आहे टोकास पकडले पण ते नाचतेच आहे मोहांध जाहलेल्या प्रेमात पेच आहे दोषांस झाकण्याहुन उघडे बरेच आहे पाताळ स्वर्ग मुक्ती सारे इथेच आहे शोधू नकोस नाही आहे असेच आहे मी भाव अर्घ्य…
-
माघ यामिनी – MAAGH YAMINI
चंद्र चारुता सुशील मुग्ध माघ यामिनी रंग रजत गडद नील मुग्ध माघ यामिनी उतरले जलात बाल किलबिलाट कोवळा जाहलेय चिंब झील मुग्ध माघ यामिनी नील कमल चंद्रवदन वादळातली कथा रांगडा थरार थ्रील मुग्ध माघ यामिनी गोडवा गुळासमान ऊस मधुर साखरी हरित पात गर्द फील मुग्ध माघ यामिनी केतकी सुगंध दर्द गझलियतित लोपला सान कोर सिद्ध…
-
ज्येष्ठ – JYESHTHA
पुत्रा तुझ्या विना पण आहे कसा जिता मी भरल्या घरात सुद्धा असतो रिता रिता मी देहात घाम मुरवत मी वावरात राबे गगनात मेघमाला मन भाव तपविता मी उलटून साठ सत्तर गेलीत कैक वर्षे होऊन ज्येष्ठ ज्येष्ठी आयुष्य अर्पिता मी हो जलद कृष्ण काळा ये बरसण्यास मजवर सुकल्या तृणाप्रमाणे आसावला पिता मी नव्हतो कधीच शायर त्यांच्यासमान…