-
वेढे – VEDHE
मस्तपैकी मी लिहावे नित्य काही मस्त बाकी तू जपावे नित्य काही कल्पना माझी असो की त्या फुलाची मस्त आणिक छान द्यावे नित्य काही संगती एकांत नाजुक सांज प्याले मस्त साकी तू भरावे नित्य काही गोठलेल्या काफियांची आ अलामत मस्त बदले मी पुरावे नित्य काही मी न माने अन जुमाने पुद्गलाला मस्त माझे मी स्मरावे नित्य…
-
मस्तपैकी – MAST PAIKI
इतुकी पुराणे अवतार इतुके ठिणगीत इवल्या आकार इतुके सिद्धांत शास्त्रे इतिहास आगम मिळताच पैका व्यापार इतुके वाचून होता रद्दीत गठ्ठे भरले पदपथी बाजार इतुके पैकीत पैकी मिळता तयांना गुण मस्तपैकी लाचार इतुके बाडे गझलची अस्सल सुनेत्रा शब्दांत नर्तन अलवार इतुके
-
धाव – DHAV
रंग रूप आरसा मनाचा तृप्त कृष्ण घन तसा मनाचा कोण डाव खेळते कुणाशी रंग गडद बघ तसा मनाचा शीळ वात घालता मजेने धाव घेतसे ससा मनाचा शिंपल्यात दो झरे वसंती गझल उधळते पसा मनाचा गाल गालगा लगा सुनेत्रा सहज पेलते वसा मनाचा
-
क्या बात – KYA BAAT
वाहवा क्या बात ही जणु दुधारी पात ही मातृधर्मा जागते नागिणीची जात ही लखलखे जणु आत्मजा टाकुनी बघ कात ही ही न मिथ्या देवता समय समई वात ही मी “सुनेत्रा” टपटपे गझल लिहिते गात ही
-
सुमक्ता – SUMAKTAA
अरेव्वा ! अरेवा ! किती सांग मात्रा .. स्वराघात धरुनी सती सांग मात्रा …. अरेवा ! अरेवा ! ! असे ते म्हणाले .. तुझ्या तू मतीने रती सांग मात्रा …. अरेवा म्हणाले जरी लीलया ते … अरेवातल्या मज यती सांग मात्रा …. स्वराघात रे वर न झाला जरी रे … अरेवातल्या रेवती सांग मात्रा ……
-
पवन – PAVAN
पात्र निर्झरी झुकून लागले भरायला लाल लाल लाल लाल लाल लाल लालला पर्ण पाकळ्या सचैल चिंब वल्लरी झरे तापल्या झळांत गात मुकुल बहर टिकवला कोणती लगावलीय वृत्त नाम कोणते मी न शोध घेत बीत काव्य धर्म भावला अंतरातल्या जळी समुद्र गुप्त जाहला शीळ घालतो न पवन कुंदनात मढवला कर्म धर्म ज्ञान ध्यान गुरुकुलात साधना सावलीत…
-
तुंबळ- TUMBAL
मंगल मंगळ मंगळवार मंदिर आगम कंदिल वार चंचल उपवन जंगल रान मंथर अंगण अंचल वार कुंदन कंकण किणकिण नाद मंद पवन घन मंजुळ वार झुंबर अंबर लखलख वीज मंचक झुलता कुंडल वार पावन बेला गोरज सांज मंत्र णमो जिन मंगल वार वृत्ती वृत्तातील प्रकार मंदाक्रांता तुंबळ वार शुक्र उगवला वारी आज मंडप मांडव मंडळ वार