Tag: Ghazal in akshargan vrutta

  • उठाठेव – UTHATHEV (UNNECESSARY FUSS)

    फुकट नसावी उठाठेव ही विकत असावी उठाठेव ही आत्महिताला जपत उमटली मनी ठसावी उठाठेव ही अहं जयाने फुका पोसला त्यास लसावी उठाठेव ही तुझीच नांगी तुझी वासना तुला डसावी उठाठेव ही नागिण सळसळ करत लहरता गात हसावी उठाठेव ही जरी उतरली नशा नाचरी परत कसावी उठाठेव ही हृदय जलाच्या तळी मंदिरी शांत वसावी उठाठेव ही…

  • सनत – SANAT(SAINT)

    मम गोष्ट धोतऱ्याची देताच परत काही त्यातील अर्थ कळण्या बसतात कुटत काही झालेत संत सन्तच आघात’स’वर करूनी जपण्या अलामतीला लिहितात सनत काही मिळताच अर्थ’सा’ला ‘रे’ला जसा दिलेला गझलेस गज्जलेची म्हणतात सवत काही ते पान धोतराचे जोडीतले धुवोनी गाळून उदक घेता जळतात धुपत काही पानांत शोभणारे मृदु पुष्प धोतऱ्याचे चाखावया विषाला फिरतात घुमत काही कोणास गंड…

  • प्रमाणे – PRAMANE (STANDARDIZED)

    खरे ते मरुन जन्माला पुन्हा येता ..झरे येथे खरे ते सत्य रेखावे जरी पाडे .. चरे येथे कधी भूकंप कोरोना निसर्गाच्या वळण वाटा खरे ते धर उमेदीने वसायाला घरे येथे फुलांचे दूत वारे ! वादळे अन कीड भुंगे ना .. खरे ते ! खोल गाभारे सुगंधाने भरे येथे … नको बाजार गप्पा वेळकाढू हृदय सोलूया…

  • बेण – BEN (SEED)

    सुधारे न मी … पु ट पु ट स्फुट भरुन शेण मी … पुटपुट स्फुट सुके बेण मी … पुटपुट स्फुट दवारेन मी … पुटपुट स्फुट ढळढळीत सत्य जिनविजय खरी देण मी … पुटपुट स्फुट दुजांच्या चुका उणीदुणी उगाळेन मी … पुटपुट स्फुट पुढे काय ते मध्यस्था विचारेन मी … पुटपुट स्फुट करुन नाक वर…

  • उजळ – UJAL (BRIGHTER)

    मार फडके व्हावया ऐना उजळ नित्य बस ध्यानास आत्म्याला उजळ अर्थ तव येईल हाती भरभरुन भरत जा आभाळ गगनाला उजळ तू नको घालूस चष्मा ती म्हणे करितसे मेकप दिसायाला उजळ का बरे ऐकू अशी तव बात मी मज मला कळते भले व्हाया उजळ आगमांना कोळुनी प्याल्यावरी तळ सुनेत्रा जाहला माझा उजळ

  • सावळे – SAVALE (DEEP)

    मौन टिपण्या सावळे मी मौन झाले माझिया जीवासवे मी मौन झाले चंद्र गोलाकार बघुनी भाकरीचा जाणत्या बकरीपुढे मी मौन झाले जाहले नेते शिकारी गर्जणारे रान ते किंचाळले मी मौन झाले रंग काळा अशुभ लेश्या काळगेले अंकशास्त्री बरळले मी मौन झाले गुंफुनी नावा ‘सुनेत्रा’ शेर लिहिता गुरु गझल घन बरसले मी मौन झाले

  • भाकीत – BHAKIT (PRESAGE)

    हातावरील रेषा रेखून राम गेला वेळेत वेळ अपुली पाळून काळ गेला जगणे सवंग होता करतात खेळ कर्मे परधर्म बघ भयावह सांगून कृष्ण गेला पंचांग तू स्वतःचे लिहिण्यास शीक मनुजा रद्दी विकून नोटा लाटून टोळ गेला लोण्यासमान जमिनी झरत्या झळा उन्हाच्या बहरात ग्रीष्म आला कढवून तूप गेला मम शब्द ढगफुटीसम तू झेलता सुनेत्रा भाकीत भेकडांचे उडवून…