Tag: Ghazal in akshargan vrutta

  • एकदा – EKADA (ONCE)

    हे खरे की बरे सांगना एकदा जे नकोसे तुला टाळना एकदा ऐकताना नको अर्थ खोदू असे कीस पाडायचे सोडना एकदा दे मला तू तुझी सर्व स्वप्ने जुनी केशरी रंग तिज फासना एकदा ओळखीचे कुणी भेटले हासले गाळुनी भाव तो बोलना एकदा आणली मी फुले पाकळ्या चांदण्या खेळ तो साजरा मांडना एकदा वृत्त- गा ल गा,…

  • घाल पाणी – GHAL PANI (WATER THE PLANTS)

    In this Ghazal the poetess says, the tree is burning from inside. So you have to give it the water of love. In the last sher poetess says, wise people tried to decide me as a mad woman. But now they will knew that I am not mad or crazy. आतून पेटलेल्या झाडास घाल पाणी…

  • कुणाला काय मी सांगू – KUNALA KAY MEE SANGU(WHAT I TELL YOU)

    In this Ghazal two kafiyas are used. This type of Ghazal is known as ‘Jul-kafiya Ghazal. Radif of this Ghazal is ‘kunala kay mee sangu?’ It means ‘what should I tell anyone? There is nothing to tell. You should experience it by your own ‘SOUL’. कसे मी तोडले तारे, कुणाला काय मी सांगू? कसे मी…

  • प्रेम माझे – PREM MAZE(MY LOVE)

    प्रेम माझे फूल आहे; पारदर्शी कूळ आहे. भाकरीचा चंद्र भाजे, पेटलेली चूल आहे. बहरणाऱ्या वृक्षवल्ली; बी-बियाणे मूळ आहे. भावनेची नेत्रभाषा; नियम आहे रूल आहे. घाव घाली जे मुळावर; शस्त्र कसले टूल आहे. प्रीत-काव्ये चुम्बिणारी; पाकळ्यांची झूल आहे. मागुनी मी घेतलेला; शब्दवेडा शूळ आहे. सागराचे दो किनारे; जोडणारा पूल आहे. पौर्णिमेच्या चांदण्यांची; बरसलेली भूल आहे. विरघळे…

  • मज आवडते – MAJ AVADATE(I LIKE)

    असून वळणे रीत प्रीतिची सरळ तुझी मज आवडते ऐक प्रियतमा तुझ्याच इतुकी गझल तुझी मज आवडते कधी झरा हा खळाळणारा किती मनाला लोभवतो डोहासम पण गहिरी प्रीति सजल तुझी मज आवडते विरघळते तव नयनी पुरती खास तुझी ही नजर अशी ओठ उघडण्या एक अंगुली कुशल तुझी मज आवडते कितीक नजरा चंचल भ्रमरी भुरळ पाडती जरी…

  • साद दे रे – SAD DERE(CALL ME )

    कशी काय बोलू मला बोलवेना कसा भार साहू अता साहवेना हृदय वाहते हे तुझ्या आठवांनी मनाला तरीही झुला बांधवेना असे वाटते सर्व सोडून यावे कुठे यायचे पण मनाला कळेना करू काय माझ्या-तुझ्या पाकळ्यांचे किती हार गुंफू गळा घालवेना खुशाली तुझी फक्त सांगेल कोणी जळो तूप सारे दिवा मालवेना सुनेत्रा सुनेत्रा अशी साद दे रे तुझे…

  • फुले – FLOWERS

    अता वेळ कोठे दुपारी मला रे नको दावू आता हुशारी मला रे जरी ना कळाली न कोडी न चाली तरी तेच म्हणती जुगारी मला रे फुले तू दिलेली किती भावली ही परी आवडे ती सुपारी मला रे फुले चुंबण्याचा  मला शौक भारी म्हणोनी म्हणावे कुमारी मला रे ‘सुनेत्रा’ शराबी पुरी झिंगली अन कळाली नशेची खुमारी…