-
अत्तर घन – ATTAR GHAN
अधर सहज मिटलेले रेषेवर जुळलेले आघात न कसलाही प्रतिघातच उठलेले पर्णांचे शुष्क थवे वाऱ्यावर उडलेले पानातुन तांबुस दो मौन तुझे हसलेले स्वप्नातच स्वप्न जणू नवल खरे घडलेले क्षितिजावर सांज उभी अत्तर घन झरलेले गा गा गा गुणगुणता उत्तर मज सुचलेले जगण्याची आस नशा जीव जगी रमलेले नीर सुनेत्रात पुन्हा पापण दल हललेले
-
आत्मजा -AATMAJAA
मोरपंखी कुंचला दहिवराने चिंबला कल्पना माझ्या खऱ्या तरल कोमल श्रुंखला गीत कविता गझल धन जीव माझा दंगला साखळी सहजी तुटे मोद भूवर सांडला जपत आले सर्वदा भाव हळवा दंगला पंचभूते नाचता काळ नाही भंगला मी सुनेत्रा आत्मजा देहरूपी बंगला
-
भावबंधन – BHAAV BANDHAN
गालगागा गाल गागा मोज मात्रा गा ल गा गा अंधश्रद्धा सोड मूढा सत्य आत्मा ढाल गागा नाव नाना अर्थ सांगे जो हवा तो घे उशाला साद देई मग पहाटे अंतरीचा ताल गा गा मी ममत्त्वाच्याच मोही म्हण हवे तर भावबंधन गात तुज जगण्यास मोदे शिकविते मी चाल गा गा लहरते रंगीत थंडी देतसे संगीत निर्झर…
-
प्राचीन कर्म – PRAACHEEN KARM
जेंव्हा मला स्मरे तव प्राचीन कर्म वेडे होतात त्या क्षणी मम शुभ भाव नर्म वेडे निष्पाप मूक प्राणी करुनी शिकार त्यांची थैल्या खुशाल शिवती सोलून चर्म वेडे जपण्यास जीव माझा मी आत्मधर्म जपते उचलून पंथ धरती त्यागून धर्म वेडे त्यांना न साधले जे आम्हास साधता रे का बोट ठेवताती धुंडून वर्म वेडे टाकून बोलताती बोलून…
-
निर्भेळ भेळ – NIRBHEL BHEL
निर्भेळ भेळ माझी आहे गझल गुणांची दिलदार खेळ माझी आहे गझल गुणांची ताशा गिटार बाजा वेणू नवी तुतारी संगीत मेळ माझी आहे गझल गुणांची देहास सत्त्वदायी ओटी भरून देण्या उजवेल केळ माझी आहे गझल गुणांची रत्नेच जी अपत्ये त्यांना सुखे रहाया साधेल वेळ माझी आहे गझल गुणांची परिणाम मी न जाणे हेतूत आत्मगोष्टी म्हणतेय हेळ…
-
साडीवाली – SAADEE VAALEE
आली आली साडीवाली आली खाली साडीवाली हिजडे छक्क्यांना जगवाया आली वाली साडीवाली दो हातांनी ठोकत टाळ्या आली खाली साडीवाली खड्डे खळगे मिरवित पाडित आली गाली साडीवाली निर्झर खळखळता होऊनी आली नाली साडीवाली सुटला साडीवाला तेंव्हा आली झाली साडीवाली अधरांवरती गालांवरती आली लाली साडीवाली हळदीकुंकू टिकली लावुन आली भाली साडीवाली संवादास्तव बोलत भाषा आली पाली साडीवाली…
-
लोंढा – LONDHAA
धादांत खोटे बोलले मी पण क्लांत खोटे बोलले मी कोंडीत लोंढा दाटलेला मन शांत खोटे बोलले मी जे जे हवे ते प्राप्त होता मज भ्रांत खोटे बोलले मी अज्ञान माझे दावण्यास्तव ते प्रांत खोटे बोलले मी बोंबा खऱ्या होत्या जरी त्या आकांत खोटे बोलले मी