-
गवा – GAVAA
काळ दवा आहे काळ नवा आहे वाज पुन्हा आता काळ हवा आहे पक्ष जरी पक्षी काळ थवा आहे भाकर भाजाया काळ तवा आहे प्रश्न नको पुन्हा काळ हवा आहे धान्य गहू साळी काळ रवा आहे बाष्प विणे झाडू काळ जवा आहे भाव फुले वाहू काळ खवा आहे पंचभुते मौनी काळ दवा आहे आत्मा सही साक्षी…
-
गळवट – GALHVAT
लटपट कळकट पाय सखी तव कंपीत काहून लटपट नटखट गाय सखी तव कंपीत काहून फुसफुस पुटपुट अस्फुट अक्षर ओढून ताणीत लटपट अनवट हाय सखी तव कंपीत काहून लवचिक कणखर वायर फायर इंग्लीश उच्चार लटपट झटपट फाय सखी तव कंपीत काहून जपत समरण कर कायर भेकड कोणी न सैनीक लटपट कडवट राय सखी तव कंपीत काहून…
-
सुसैनी -SUSAINEE
मम जीव सैनी आहे स्याद्वाद जैनी आहे माझ्यावरीच फिदा मी काव्यात चैनी आहे करवंद काळी जाळी मैनेत मैनी आहे श्रद्धा जिनायतनावर बिंबात ऐनी आहे प्रतिके अशी स्मरणीची मासा असैनी आहे दे जीवदान तयांना नवरात्र रैनी आहे छाटावया चुकांना कलदार पैनी आहे काहून घेऊ राज्या पाळीत वैनी आहे जागी सदैव “सुनेत्रा” लिहिण्या सुसैनी आहे
-
सवारी – SAVARI
तरही गझल … सवारी गझलेची पहिली ओळ कवी धनदत्त बोरगावे मिरज यांची माझी टमटम चालली गावाला वेगात सहा आसनी गावाला टांगे बग्ग्या सायकल रिक्षांचा काळ पुराणा जोजवी गावाला मस्त सवारी सारवट गाड्यांची कुडची मोरब चिंचली गावाला गागागागा गालगा गागागा लगक्रम मात्रा मोजणी गावाला शेवंतीचे ताटवे फुलवाया जलदांची जल वाटणी गावाला अर्थ सुगंधी अक्षरी दरवळतो गझलांजन…
-
शर्वरी – SHARVAREE
संगमरवरी रात शर्वरी चरण कशाला जोड कर वरी हृदय मंदिरी ब्रम्ह हर वरी केवळ आत्मा पूज्य वर धरी ल ल ल गा ल गा पंख पर वरी
-
संकेत – SANKET
संकेत बोलताती चंडोल गीत गाती वाऱ्यासवे इशारे करतात रंग साती जीवास मी जपावे मम धर्म सांगताती आला निशांत समय शोधू कळीत नाती अर्थास अर्थ देण्या समयांत प्रीत वाती
-
फडे – FADE
तरही गझल गझलेची पहिली ओळ शाहीर कुंतीनाथ करके यांची फडे हिऱ्यांचे खडे शोभती पंचारती काकडे शोभती जसे शिपाई निळ्या डोंगरी तसे दुधारी कडे शोभती हिमालयावर मुनी ध्यानरत झडे नवल चौघडे शोभती चरण कमल उमटता वालुकी विटेवरी कानडे शोभती जलद “सुनेत्रा” झरुन अंगणी सुकेशरी दव सडे शोभती