-
व्यर्थ नाही – VYARTH NAAHEE
पत्थराला शेंदराने लिंपणे सोड आता देव असले पूजणे व्यर्थ नाही क्षीर नागा पाजणे कारल्याला पाक घालुन मुरवणे नाद केव्हा सोडशिल तू सांग हा चढत जात्या पावलांना ओढणे घालता गुंफून माळा तू गळा वाटते ना ते मला मग लोढणे धावती मागून माझ्या काफिये फार झाले शर्यतीतून धावणे तिंबली ऐसी कणिक मी चेचुनी शस्त्र माझे सज्ज बघ…
-
आरक्त – AARAKT
लोक हे दिसले न पूर्ण विरक्त मजला वाटले काही तरी पण सक्त मजला प्राशुनी माधुर्य गझले पश्चिमेसम सांजसमयी व्हायचे आरक्त मजला जोगवा मागे न पाळे मी तिथीही का तरी म्हणतात कोणी भक्त मजला आवडे मज मम मुठीतुन विश्व बघणे मौन म्हणते राहुदे अव्यक्त मजला ही बरी की ती सुनेत्रा काय सांगू जी खरी ती भावते…
-
लगा गालगा – LA GAA GAAL LA GAA
कुणी चेचले सांग तुला कुणी पाडले सांग तुला नकोसे तुझे हे जीवन रे कुणी टोचले सांग तुला लगागा लगा गा गालल गा कुणी फिरवले सांग तुला असे वागणे सोड बरे कुणी ठोकले सांग तुला मुळे पकडुनी घट्ट रहा कुणी पकडले सांग तुला लगा गालगा गाल लगा कुणी वाचले सांग तुला सुनेत्रातले अर्थ खरे कुणी दावले…
-
छडी – CHHADEE
अंध गुढीची छडी अंध पिढीची छडी दे दे फेकूनिया अंध रुढीची छडी
-
कृपाळा – KRUPALA
पावसाळा मेघ काळा भिजत राही मुक्त टाळा कुंडल्यांचे स्तोम जाळा रोग टळण्या नियम पाळा अक्षरांना नीट गाळा कलम किल्ली मी कृपाळा उघडला मम कनक टाळा
-
सोड – SOD
पडलं ! कुठलं ! घोडं .. बाई घोडं ! पडलं ! सुटलं ! कोडं .. बाई घोडं ! बघुन हिरवं रान, गाया गाणं ! पडलं ! बसलं ! थोडं ..बाई घोडं ! धरलं म्हणुन, आलं हाती सोनं ! पडलं ! पुजुन ! जोडं.. बाई घोडं ! “धन उधळत”, बोल म्हणता वात ! पडलं ! हसलं…
-
महान ईश – MAHAAN EESH
शांत चित्त शुद्ध देह माय तृप्त चिंतनात सांग याहुनी महान ईश कोणता जगात मेंढरे जरी बरी खरी हुशार माकडेच जांभळ्या फळांस गोड ठेवतात काळजात एक शेर जादुगार मम सुनेत्र त्यात दोन जांभुळासमान गडद काळजास छेडतात अर्घ्यरूप आसवात चिंब जाहलेय बिंब पाहतेय ऐकतेय उमटतेय मौन रात अंतरात लावलीस जी अजून तेवतेय ना हलेल अन विझेल वादळात…