-
आत्मसुंदरी – AATM-SUNDAREE
मी आत्मसुंदरी आहे लढणार संगरी आहे निष्पाप माणसे माझी जपणार अंतरी आहे होतोय फायदा पुण्या हा न्याय भूवरी आहे आभाळ टेकले भूवर जिनदेव मंदिरी आहे मम् शस्त्र लेखणी भारी संदेश अक्षरी आहे चिखलात पत्रिका बुडली नक्षत्र अंबरी आहे आत्म्यास जाणता कोणी देवत्त्व कंकरी आहे गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १४) लगावली – गागालगा/लगागागा/
-
अजब गजब – AJAB GAJAB
गझल गझल गज़ल गजल मस्त काव्य जाहलेय चिंब धवल मस्त काव्य शब्दरूप कुंतलात कुरळ गाठ भिजत भिजत होय सरल मस्त काव्य रंगभोर श्रावणात जलद भरुन ठिबकतेय शुभ्र सजल मस्त काव्य काफिया रदीफ सारवान एक अजब गजब अमल नवल मस्त काव्य गच्च दाटली पहाट पावसात विहरतेय त्यात तरल मस्त काव्य गझल (मात्रा १८) लगावली – गालगाल/…
-
हाण – HAAN
हाण चार थोबाडावर हाण मार थोबाडावर पाचवीस जो तू पुजला हाण जार थोबाडावर गुंफ मोगरा वासाचा हाण हार थोबाडावर रंग बदलु गिरगिट सरडे हाण ठार थोबाडावर लाव दीप नालीपाशी हाण बार थोबाडावर बेवड्यास पाजुन सरबत हाण सार थोबाडावर गात न्हात खाण्यासाठी हाण वार थोबाडावर खाज ज्यास सुटते राजस हाण खार थोबाडावर तेच षंढ छक्के आले…
-
शांतरसमय – SHAANT RAS MAY
बरसत्या धारांमधूनी नाद ऐकू येत आहे शांतरसमय सागरी लाटांमधूनी गाज ऐकत वात वाहे शांतरसमय चालली वारी पुढे ही रंगल्या भक्तांसवे या पंढरीला सोहळा भिजल्या मनांचा सावळा आषाढ पाहे शांतरसमय भावघन श्रद्धा म्हणोनी शब्दधन मी मुक्त सांडे लेखणीतुन बाग मग सारस्वतांची माझिया काव्यात नाहे शांतरसमय बांधुनी तालासुरांनी अक्षरे लय साधणारी गीत बनता बंदिशीतिल राग माझ्या अंतरी…
-
अहंता – AHANTAA
गढुळलेल्या दो नद्यांचे गोठले जल काव्य माझे वाहणारे जाहले जल कैक सुंदर भावनांचे अंबरी घन नाचता त्यातून बिजली सांडले जल ज्या अहंतेला स्वतःचे ना जरी भय त्या मदांवर मी खुषीने सोडले जल बंगला गाडी तुझी ती हाय क्षुल्लक त्याहुनी प्रिय आसवांचे वाटले जल आपला पाऊस असुनी वाटतो पर वाटुदे कोणास काही बोलले जल गझल अक्षरगणवृत्त…
-
स्तन्यदा – STANYADAA
पानजाळीतून पाहे, चंद्र तो आहे खराकी, बिंब पाण्यातिल खरे प्रश्न वेडे का पडावे, आजसुद्धा ते तसे तुज, शोध आता उत्तरे वेड वेडे लागले होते कुणाचे, पाहुनी डोळ्यात माझ्या, सांग रे मोकळे आभाळ होण्या, व्यक्त तू बरसून व्हावे, एवढे आहे पुरे वेड लावे वीज चपला, वादळांशी झुंजताना, फिरुन वेडे व्हावया ती विषारी वावटळ पण पांगल्यावर, वादळासह,…
-
वेल – VEL
वाटेवरले टाळत धोंडे वेल कपारीवरी जिजीविषेने वर वर चढते वेल कपारीवरी चढता चढता पुढे लागता संगमरवरी घाट जगण्यासाठी खाली उतरे वेल कपारीवरी वेल न म्हणते मी तर नाजुक कशी कळ्यांना जपू मूक कळ्यांचा भार वाहते वेल कपारीवरी प्रकाश माती हवेत राहुन पाणी शोषायास हवे तेवढे वळसे घेते वेल कपारीवरी ऋतू फुलांचा वसंत येता बहरून सळसळुनी…