-
संत – SANT
नाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे गाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे आरशाने तुझ्या त्या मला रूप दिधले भाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे जाहल्या एवढया गोड जखमा सुगंधी घाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे संत होते तुझ्या अंतरी भेटलेले साव का मी सुनेत्रा तुझे आठवावे वेड होते मला जिंकण्याचे मलाही डाव का मी सुनेत्रा…
-
चौकट – CHOUKAT
तरही गझल गझलेची पहिली ओळ गझलकार इलाही जमादार यांची तसा कुणाच्या चौकटीत तो बसला नाही तरी कुणाला अंगणातही दिसला नाही फुलाफुलांची अंगणातली रांगोळी ही तिला जपाया पावसातही फसला नाही हवेहवेसे रंग फासुनी भिजवुन मजला कधीच माझ्या चौकटीत तो घुसला नाही जरी नव्याने चौकटीतल्या विश्वी रमले तरी कधीही मूक होऊनी रुसला नाही कसे हसावे हेच शिकविले…
-
हवाई – HAVAAEE
टाळ्या पिटू कवींची चोहीकडे सराई जो तो म्हणे स्वतःशी आहेच मी सवाई टाळ्या असोत अथवा तो गजर वाहवाचा करतोच जो इथेरे त्याची टळे पिटाई शंका नको पुसू तू अन जाबही कुणाला गिळण्यात मूग बसूनी आहे तुझी भलाई प्रश्नांस फोड वाचा अन मिळव उत्तरांना ना फोडशील वाचा करणार ते धुलाई तू फक्त मस्त म्हणरे मजला नकोत…
-
गात गाणे – GAAT GAANE
सांज व्हावी मोरपंखी रात यावी गात गाणे रामप्रहरी वारियाने जाग यावी गात गाणे वेदनांचा अंत व्हावा प्रेम या जगती फुलावे मूक झालेल्या विजेची साद यावी गात गाणे चंद्र तारे सूर्यसुद्धा डोकवावा अंतरी मम मी असावे स्वच्छ ऐना प्रीत यावी गात गाणे मी जशी आहे तशी मी वागते अन बोलतेही सांगण्या हे वादळाची हाक यावी गात…
-
आनंद – AANAND
आनंद अज्ञानातही असतो कधी माणूस तेव्हा त्यातही रमतो कधी नाही जरी त्याला जमे झरणे पुन्हा फुलवावया वृद्धांस तो झरतो कधी शोधावया कोणा जरी फिरतो सदा माझे तरी नाही कुणी म्हणतो सदा कोणावरी केली न प्रीती सांगतो मौनातल्या बिंबात का बुडतो कधी जिंकावया निघतो जगा शस्त्रांसवे गोष्टीतल्या युद्धातही हरतो कधी खेळात आता खेळ नाही वाटता लांबून…
-
बारी – BAAREE
बाहेर तू उन्हाने होशील तप्त भारी डोक्यातल्या भुश्याची पेटेल आग सारी या शायरीत माझ्या आहेच जल सुगंधी ते शिंपडून पाणी विझवेल आग झारी क्षितिजावरून वाहे झुळझूळ शीत वारा त्याच्यासवे ढगांची आता निघेल वारी नाही कसे म्हणावे वळीवास त्या धरेने होती अधीर तीही चाखावया खुमारी घेऊन मौन ओठी तू ऐक गझल माझी आता हसावयाची अमुची असेल…
-
विसर सारे – VISAR SAARE
काळजाला थोपटावे अंथरावे वाटले तर …विसर सारे …. वापरोनी ते धुवावे वाळवावे वाटले तर …विसर सारे…. काष्ठ पत्ती वाळवीली चूल दगडी पेटवीली …भर दुपारी…. त्या चुलीवर काळजाला पेटवावे वाटले तर …विसर सारे …. सांगते ती सावजाला मी जपावे काळजाला …अंथरोनी…. मीच चालुन त्यावरी ते चुरगळावे वाटले तर …विसर सारे …. हाक ती मारीत आहे चालली…