-
प्रमाणे – PRAMANE
खरे ते मरुन जन्माला पुन्हा येता ..झरे येथे खरे ते सत्य रेखावे जरी पाडे .. चरे येथे कधी भूकंप कोरोना निसर्गाच्या वळण वाटा खरे ते धर उमेदीने वसायाला घरे येथे फुलांचे दूत वारे ! वादळे अन कीड भुंगे ना .. खरे ते ! खोल गाभारे सुगंधाने भरे येथे … नको बाजार गप्पा वेळकाढू हृदय सोलूया…
-
बेण – BEN
सुधारे न मी … पु ट पु ट स्फुट भरुन शेण मी … पुटपुट स्फुट सुके बेण मी … पुटपुट स्फुट दवारेन मी … पुटपुट स्फुट ढळढळीत सत्य जिनविजय खरे देण मी … पुटपुट स्फुट दुजांच्या चुका उणीदुणी उगाळेंन मी … पुटपुट स्फुट पुढे काय ते मध्यस्था विचारेन मी … पुटपुट स्फुट करुन नाक वर…
-
उजळ – UJAL
मार फडके व्हावया ऐना उजळ नित्य बस ध्यानास आत्म्याला उजळ अर्थ तव येईल हाती भरभरुन भरत जा आभाळ गगनाला उजळ तू नको घालूस चष्मा ती म्हणे करितसे मेकप दिसायाला उजळ का बरे ऐकू अशी तव बात मी मज मला कळते भले व्हाया उजळ आगमांना कोळुनी प्याल्यावरी तळ सुनेत्रा जाहला माझा उजळ
-
सावळे – SAVALE
मौन टिपण्या सावळे मी मौन झाले माझिया जीवासवे मी मौन झाले चंद्र गोलाकार बघुनी भाकरीचा जाणत्या बकरीपुढे मी मौन झाले जाहले नेते शिकारी गर्जणारे रान ते किंचाळले मी मौन झाले रंग काळा अशुभ लेश्या काळगेले अंकशास्त्री बरळले मी मौन झाले गुंफुनी नावा ‘सुनेत्रा’ शेर लिहिता गुरु गझल घन बरसले मी मौन झाले
-
भाकीत – BHAKIT
हातावरील रेषा रेखून राम गेला वेळेत वेळ अपुली पाळून काळ गेला जगणे सवंग होता करतात खेळ कर्मे परधर्म बघ भयावह सांगून कृष्ण गेला पंचांग तू स्वतःचे लिहिण्यास शीक मनुजा रद्दी विकून नोटा लाटून टोळ गेला लोण्यासमान जमिनी झरत्या झळा उन्हाच्या बहरात ग्रीष्म आला कढवून तूप गेला मम शब्द ढगफुटीसम तू झेलता सुनेत्रा भाकीत भेकडांचे उडवून…
-
पण – PAN
आहे अजून आहे आहे हयात मी पण व्यवहार चोख माझा मम निश्चयात मी पण काव्यास मोल इतुके झुकती बड्या असामी शब्दात भाव भरता आदी लयात मी पण स्वर साधना सुरांची तालात चूक नाही मन मेघ बरस बरसे झरत्या वयात मी पण तारा जुळून आल्या नकळत मला तुलाही वृत्तात सत्य वृत्ती नाही भयात मी पण नामी…
-
गिरी धन – GIREE DHAN
चलन वलन सत्य शाश्वत आत्मा साक्षी मम अचल चलावर गिरी धन आत्मा साक्षी मम ललल ललल गाल गालल गागा गागा लल लगावली मात्र भूजल आत्मा साक्षी मम