Tag: Ghazal in akshargan vrutta

  • खेच – KHECH

    जगण्यात टेच आहे सुंदर खरेच आहे लक्ष्यास बाण भेदे धनुरात खेच आहे प्राजक्त बकुळ पुष्पे लक्षात वेच आहे करुनी फुकाच घाई चुकल्यासम ठेच आहे टोकास पकडले पण ते नाचतेच आहे मोहांध जाहलेल्या प्रेमात पेच आहे दोषांस झाकण्याहुन उघडे बरेच आहे पाताळ स्वर्ग मुक्ती सारे इथेच आहे शोधू नकोस नाही आहे असेच आहे मी भाव अर्घ्य…

  • माघ यामिनी – MAAGH YAMINI

    चंद्र चारुता सुशील मुग्ध माघ यामिनी रंग रजत गडद नील मुग्ध माघ यामिनी उतरले जलात बाल किलबिलाट कोवळा जाहलेय चिंब झील मुग्ध माघ यामिनी नील कमल चंद्रवदन वादळातली कथा रांगडा थरार थ्रील मुग्ध माघ यामिनी गोडवा गुळासमान ऊस मधुर साखरी हरित पात गर्द फील मुग्ध माघ यामिनी केतकी सुगंध दर्द गझलियतित लोपला सान कोर सिद्ध…

  • ज्येष्ठ – JYESHTHA

    पुत्रा तुझ्या विना पण आहे कसा जिता मी भरल्या घरात सुद्धा असतो रिता रिता मी देहात घाम मुरवत मी वावरात राबे गगनात मेघमाला मन भाव तपविता मी उलटून साठ सत्तर गेलीत कैक वर्षे होऊन ज्येष्ठ ज्येष्ठी आयुष्य अर्पिता मी हो जलद कृष्ण काळा ये बरसण्यास मजवर सुकल्या तृणाप्रमाणे आसावला पिता मी नव्हतो कधीच शायर त्यांच्यासमान…

  • ओणवी – ONAVI

    भूवरी सांडते चांदणे चालताना गझलकारिणी माधवी त्यागुनी दाव तू माय तरही गझल अंधश्रद्धे तुझी ओणवी कर्म प्राचीन हे बोलते बघ तुझे आज द्याया फळे शाम्भवी जानकी जाण तू सत्य शिव पारखाया तुझी कागदी पल्लवी खोल गर्तेतल्या भोवऱ्यासंगती घेत वळसे झुले मोकळे मान वेळावते वल्लरी ही कवी कल्पना ना नदी जान्हवी दूर क्षितिजावरी दाटता मेघमाला निळ्या…

  • चौकशी – CHOUKASHI

    कशाला चौकशी आता तयांच्या कूट डावांची खुशीने मौन मी घेते कळाली जीत भावाची फुलांची गोष्ट मी लिहिता सुवासिक हात मम झाले फळाली निश्चयाने नय कथा व्यवहार नावाची घरांची अंगणे झाडून पोरी भिजविती माती जुनी ओळख जपाया सुगंधाच्या स्वभावाची जराही भ्यायले नव्हते तरीही गोठली गात्रे मला होती कळाली गुप्त भाषा त्या ठरावाची नदीकाठी पुराने घातला हैदोस…

  • मनमोर – MANMOR

    जाईल जीव ऐसे हसणे बरे नव्हे रडवून तेच रडणे बघणे बरे नव्हे रंगावरून आत्मा कैसा कळे खुणा कळतेच सर्व मजला म्हणणे बरे नव्हे मनमोर नाचणारा म्हणता नको नको तू त्यास जवळ ये ये वदणे बरे नव्हे उधळून रंग सारे श्रावण निघून गेला तो भादव्यात येता धरणे बरे नव्हे शेरात नाव लिहिण्या जागा कितीतरी मक्त्यातली सुनेत्रा…

  • मां – MAA

    जुन्या फायलींचे नवे बाड झाले तुझे मूळ कारण तुला कांड झाले तुला पावल्यावर बने बाहुली ती गगन चुंबण्याला जरी माड झाले तुझी लेक असुनी जणू लेक वाटे लढायास कुस्ती किती जाड झाले वसंतात भरले शिशीरात गळले उभी वाळल्यावर सुके हाड झाले धुके दाटल्यावर तुला ही दिसेना फुपाटा असोनी म्हणे राड झाले तुझे भुंकणे की नवी…