Tag: Ghazal in akshargan vrutta

  • अधीर मस्त नाचरा – ADHEER MAST NAACHARAA

    स्वरात कंप कापरा अधीर मस्त नाचरा मधाळ धुंद बावरा अधीर मस्त नाचरा कवाड बंद का असे उनाड वात तापण्या झरावयास मोगरा अधीर मस्त नाचरा लिहावयास लावणी भिजेल आज टाकही बनेल लाज-लाजरा अधीर मस्त नाचरा तुलाच चुंबिण्या प्रिये झुलेल श्रावणात तो उडे धरून कासरा अधीर मस्त नाचरा कपोत हूड गोल तो खुलेल पावसात या म्हणेल गाच…

  • डॉटर – DAUGHTER

    श्रावणाची डॉटर मी चक्रवाली पॉटर मी नीर आहे गडद निळे हॉट नाही हॉटर मी गाठ नाजुक मारतसे गुरव अस्सल नॉटर मी झेल घेण्या अवघड रे हात सुंदर कॉटर मी मोरपंखी बॉटलचे शुद्ध क्षारद वॉटर मी वृत्त -गा ल गा गा, गा ल ल गा

  • गटारी – GATAAREE

    आली पुन्हा गटारी आता धुवा गटारी काढून गाळ कचरा झाडून घ्या गटारी येता अवस दिव्याची लावा दिवा गटारी प्याल्यात गझल बघुनी हसती पहा गटारी मद्यालयास टाळा लावे नवा गटारी वृत्त – गा गा ल गा, ल गा गा.

  • कीर्द खतावणी – KEERD KHATAAVANEE

    कुणी कुठून आणली कीर्द खतावणी फुका पुसे खडूस बोचरे प्रश्न असे तसेच का हवीस तू मला गडे बोलतसे फुलास तो अशाच सांगुनी कथा रमवतसे स्वतःस का कधी उशीर जाहला फी तुज द्यायला मला उगाच चौकशा करी सांग मिळे पगारका हिशेब छान शिकविले शिस्त जरी कडक असे हुशार मी खरी खरी जाणुन गोष्ट मौन का गुरूपणा…

  • बाईपणा – BAAEEPANAA

    रत्नात रत्न सुंदर बाईपणाच माझा सांगे लिहावयाला आईपणाच माझा संस्कार वर्ग माझा शिकण्यास रीतिभाती जपतो मुलाफुलांना दाईपणाच माझा ती मूढता तयांची वेगास खीळ घाली नडणार कोडग्यांना घाईपणाच माझा मम लेखणीत शिरुनी या वासरीवरीरे मांडेल भावनांना शाईपणाच माझा नसते कुटील कपटी माया खऱ्या गुरुंची मायेस साक्ष त्यांच्या माईपणाच माझा जेथे नको तिथेही हे मारतात शेरे लावेल…

  • काट्यास काढतो मी – KAATYAAS KAADHATO MEE

    शुन्यात पाहतो मी पुण्यात डुम्बतो मी प्राचीवरी उगवुनी शुक्रास शोधतो मी सायीस मस्त घुसळुन लोण्यास काढतो मी अश्रूतल्या मिठाला नक्कीच जागतो मी तव भावनेस सप्पग लवणात घोळतो मी सलतो तुला सदा त्या काट्यास काढतो मी सारे फितूर वारे पंख्यात डांबतो मी होऊन कृष्ण काळा गाईंस राखतो मी सांजेस केशरीया रंगात माखतो मी वृत्त – गा…

  • डोलकर – DOLKAR

    झोल मज दिसलाच नाही टोल तर भरलाच नाही कोठवर असले गं बोलू गोल तर उडलाच नाही सांग घन कुठला खरा रे बोल सत कळलाच नाही खाप अन वजने तराजू तोल पण वदलाच नाही तीर बघ सुटले कितीदा ढोल ढग फुटलाच नाही आठवण असली तरीही कोल तिज म्हटलाच नाही वावटळ उठली ‘सुनेत्रा’ डोलकर हरलाच नाही वृत्त…