Tag: Ghazal in akshargan vrutta

  • लिहिते गझल जिथे मी – LIHITE GAZAL JITHE MEE

    लिहिते गझल जिथे मी वाजे नुपूर तेथे कोणीतरी लपोनी येते जरूर तेथे तव नाव झाकता मी हसतोच शेर गाली मग ओळ ओळ माझी लाजून चूर तेथे पाऊस लेखणीच्या डोळ्यांमधून झरता भिजवून चिंब गात्रे नाचे मयूर तेथे शब्दांस वाकवे मी मज शब्द नाचवीती कोणीच ना उरे मग हांजी हुजूर तेथे तू लाख टाळशी पण मक्त्यात मीच…

  • भांडू नये कुणाशी – BHAANDOO NAYE KUNAASHEE

    भांडू नये कुणाशी कळते तरी न वळते भांडायला न कोणी तेव्हा स्वतःस पिळते सारेच गोडबोले कंटाळले पुरी मी भांडायला अताशा कोणी कसे न मिळते? स्पर्धाच घेउयाका भांडायची कुणाशी टिकणार मीच खमकी ना मी मधून पळते भांडायचे कशाला कोणी म्हणू नये रे त्याची मजा लुटे जो त्यालाच फक्त कळते मनसोक्त दाद देते कद्रूपणा न करते जो…

  • माझ्यावरी फिदा ही – MAAZYAAVAREE FIDAA HEE

    माझ्यावरी फिदा ही माझी गझल दिवाणी ती तोलते मलाही आहे किती शहाणी मी पाझरे अताशा हलक्याच चाहुलीने हृदयात अमृताच्या आहेत कैक खाणी दचकून जाग आता मजला कधी न येते असते सदैव जागी माझ्यात एक राणी अफवाच पेरती ते त्यांचेच पीक घेती असली पिके विकाया लिहितात ते कहाणी माझी-तुझ्यातली ही प्रीतीच तारणारी गोष्टीतुनी खळाळे मम प्रेमरूप…

  • सांज चालली निवांत – SAANJ CHAALALEE NIAANT

    अंगणास सारवीत सांज चालली निवांत सौख्यरूप सावलीत ऊन बैसलेय शांत चैत्रवेल गारवेल कुंपणास बिलगलीय चंद्रकिरण प्राशतोय चिंब चिंब चंद्रकांत चांदण्यास पाखडे निशा बसून अंबरात रातराणि सजुन जाय दागिन्यात नखशिखांत पसरता उषा-प्रकाश काजवा निघे घरास पारिजात टपटपेल साद घालता निशांत चंचलेत चामरात कामिनीत भामिनीत काव्य-वाटिकेत मुक्त बहरलाय काव्यप्रांत वृत्त – चंचला, मात्र २४ लगावली – गा…

  • एकदाच फक्त सांग – EKADAACH FAKT SAANG

    एकदाच फक्त सांग माझियात काय खास मापट्या समान नाक की सुडौल पाय खास पात हरित करकरीत सळसळे खुल्या उन्हात जणु उनाड चंचला म्हणे सुरात हाय खास भाज पात फोडणीत लाल तिखट मीठ वरुन डाळ घाल पीठ पेर आर्द्रता भराय खास अक्षरात इंग्रजी सजेल गझल घाटदार त्यात मस्त झेड केंद्र गुप्त एक्स वाय खास तेहतीस कोट…

  • काफिया रदीफ खास – KAAFIYAA RADEEF KHAAS

    काफिया रदीफ खास वेगळीच गझल आज वृत्त तेच चंचलाच पण सुखांत आज बाज लाट लाट उसळताच खळखळे भरात नाद हा समुद्र भावभोर अंतरी उधाण गाज सोडलेस तू जलात तारु स्वैर वादळात धीर मी न सोडलाय सोडलेन कामकाज ओहटीत नीर शांत शारदीय चांदरात मौन सोड बोल भांड पैंजणे बनून वाज वीर नार देतसे समुद्र देवतेस अर्घ्य…

  • शुभ्र कुंतलात सांग – SHUBHR KUNTALAAT SAANG

    शुभ्र कुंतलात सांग गुंतणे अता कशास होउया तरंगरूप बिंब सांगते जलास आस संपताच भास दूर जाय क्षितिजपार हारजीत कागदीच जिंकले कुणी कुणास? भांडण्यास भेटलो उन्हामधील चांदण्यात तीच वेळ खूप मस्त वाटली जरी न खास भावभोर लोचनात सांजस्वप्न दाटताच देतसे गुलाबपुष्प कंटकासही सुवास तू तसाच मी अशीच भेटण्यास ये निवांत रंगुदेत मैफिलीत माझिया-तुझ्या घरास वृत्त –…