-
वेडी – VEDEE
कुणी गुदगुल्या, करून हसवे, येते त्याला, त्यात मजा! कुणी टवाळी, करून खिदळे, येते त्याला, त्यात मजा!! सुरेख मैफल, गझल शरांची, उडती लाटा, हास्याच्या! कुणी तिऱ्हाइत, उगाच रडते, येते त्याला, त्यात मजा!! भुईनळ्यांची, चमचम वर्षा, पाडुन कोणी, बागडते! कुणी फटाके, उडवित बसते, येते त्याला, त्यात मजा!! फुलांस धुंडित, मधास प्राशित, पाकोळी अन, भृंग फिरे! कुणी शिकारी,…
-
लाडके – LAADAKE
हे खरेकी, मी न याला, राग म्हणतो लाडके! मूळ संख्येला दिलेला, भाग म्हणतो लाडके… लाजणे जमतेच कोठे, सांग तुजला रागिणी; रक्तिम्याला नेत्रिच्या अनुराग म्हणतो लाडके! का सदा हृदयात कटुता, डूक धरण्या, नागिणी? माझिया मी वासनेला नाग म्हणतो लाडके.. रंगवेड्या लालसेचे, लाड मी करुनी फुका; चंदनी देहास तुझिया, साग म्हणतो लाडके! तीट तुझिया, हनुवटीवर, कोण लावी…
-
वसंत गाणे – VASANT GAANE
Vasant Gaane means Spring Song. Through this spring song, the poetess expresses a myriad of feelings and thoughts which come to her mind. माझ्या तुझ्यातल्या त्या गोष्टी किती जपू मी मम प्रेम भावनेला कैसे म्हणू रिपू मी माझेच नेत्र आता बनलेत दीप-ज्योती मिथ्या तुझ्या कथांनी आता कशी दिपू मी सौंदर्य भावनेला आजन्म प्राशुनीया मज सत्य…
-
सत्यम शिवम सुंदरम!
This ghazal speaks about living in the beautiful present instead of staying in the stagnant past. The ghazal also presents the poetess’ intention to protect life so that it flourishes. In the end, the poetess says it is better to not pursue the unreliable “mirage” called future. सत्य शिव दिसे सुंदर! जायचे कशाला मी!! साचल्या…
-
माघार शक्य नाही – MAAGHAAR SHAKYA NAAHEE
जिंकेन सर्व हृदये माघार शक्य नाही शिखरावरी उभी मी पडणार शक्य नाही मिळवेन सर्व सौख्ये खेचून सर्व तारा सध्यातरी इथूनी हलणार शक्य नाही परिघावरी कसेही फिरती अनेक शत्रू केंद्रातुनी कधीही ढळणार शक्य नाही मजबूत पकड माझी आसावरी अशीकी उडतो पतंग वेगे कटणार शक्य नाही दृष्टीस धार इतुकी कापेल दुष्ट नजरा अश्रू अमोल माझे झरणार शक्य…
-
पात्र – PAATRA
आत्मघाती संस्कृतीचा कळस खोटा छान तू सुंदरांच्या प्रकृतीचा पाय सोटा छान तू संधिसाधू बेरकी ते अक्षरांना बदलती मस्त त्यांना ठोक द्याया दगड गोटा छान तू मंदिरे ते बांधताती फायदा लाटावया संत बनुनी कमव आता पुण्य तोटा छान तू मोडण्या लग्ने तयांचा कुंडलीचा फार्स हा गूण मग जुळवीत बसती मोज नोटा छान तू हाच मोठा मीच…
-
सत्य – SATYA
जिंकणार सत्य आज वाजणार सत्य आज पाहताच मुग्ध भाव लाजणार सत्य आज शुभ्र मेघ अंबरात हासणार सत्य आज वीज नाचता नभात वर्षणार सत्य आज खोडसाळ जो तयास चोपणार सत्य आज आत्मरूप दर्पणात भाळणार सत्य आज नेत्र नयन लोचनात झळकणार सत्य आज वृत्त – गा ल, गा ल, गा ल, गा ल.