Tag: Ghazal in akshargan vrutta

  • गिरी धन – GIREE DHAN

    चलन वलन सत्य शाश्वत आत्मा साक्षी मम अचल चलावर गिरी धन आत्मा साक्षी मम ललल ललल गाल गालल गागा गागा लल लगावली मात्र भूजल आत्मा साक्षी मम

  • झनक ठुमक – ZANAK THUMAK

    झनक ठुमक ताल ठेका पाऊले पहा लयीत लय सूर ठेका पाऊले पहा बांबु बन डुले हले मेघ फुलोरा झुले केवडा सुगंध ठेका पाऊले पहा ललल ललल गाल गागा गागागालगा लगावला मस्त ठेका पाऊले पहा तरुण वरुण वीज वारा झुलते नभ धरा भावले ढगांस ठेका पाऊले पहा गात सुनेत्रा तराणे नाचे अंगणी नयन हस्त चरण ठेका…

  • पाहुड – PAAHUD

    जखमा उरातल्या त्या होत्या जरी सुगंधी मम जाण अंतरीची आहे खरी सुगंधी म्हणतात पुष्प प्रेमी आकर्षणास प्रीती प्रीतीत मोह जादा असते दरी सुगंधी तांब्यातल्या जलाची तपताच वाफ झाली शीतल झुळूक स्पर्शे आल्या सरी सुगंधी मागेल मोल करणी पंचायती कुळांच्या कुंदन मण्यात काळ्या धन घागरी सुगंधी पावास चीज लोणी तडका तमालपत्री मिसळीसवे कटाची शाही तरी सुगंधी…

  • श्रीमती – SHRIMATEE

    धबधब्यात सांडव्यात छात्र नाहले तैलधार जोगव्यात क्षात्र नाहले बनविण्या गुलाब जाम पाक साखरी शहर गावच्या खव्यात पात्र नाहले बघ बरी लगावली डब्यास उघडण्या सरबती गहू रव्यात मात्र नाहले अवस भाव भोर चिंब दाटता उरी घन अमीर काजव्यात गात्र नाहले सान पोर ती कुवार अर्थ श्रीमती चांदण्यात चांदव्यात शास्त्र नाहले

  • पटोला – PATOLAA

    अबोली पटोला भरजरी पटोला नवलखे अलिकुले किनारी पटोला न घोला न अंचल निळाई पटोला गझल गझलियत स्वर जपावी पटोला गडद कुंकवासम शबाबी पटोला सळसळे शिवारी बहारी पटोला कनक जोडव्यांची नव्हाळी पटोला उन्हाळी फुलांची हळदुली पटोला हरित पल्लवीची मखमली पटोला निसुन्दी मनावर मुरुकुला पटोला न विंजन न वारा भरारी पटोला तराया तरोहण तराफी पटोला स्वरूनादबिंदे समाही…

  • अणू – ANOO

    तुझी वासना ठेव तुज जवळ तू निजी कामना भावना कवळ तू कराया निवाडा स्वतः साक्ष हो जुनी जीर्ण वस्त्रे पुरी सवळ तू न कोप करता शिकत जावे बरे उन्हाने तपव देह मथ खवळ तू कळाया तुला सर्व पर मोह तो उकळ मौन द्रव्ये तळा ढवळ तू गुरा वासरांना चरायास ने बसूनी दुपारी चऱ्हाट वळ तू…

  • नोंदणी – NONDANI

    विसरतेस जेव्हा कधी ओढणी तू रुमालास करतेस जल गाळणी तू पुरे जाहल्या चौकशा पोलिसी रे तपासून घ्यावी प्रुफे नोंदणी तू जुन्या पुस्तकांना पुन्हा चाळ थोडे कळायास संदर्भ झटक मांडणी तू घरातील खोल्या कवाडे किती ते जरा लक्ष घालून खडा हो झणी तू सुनेत्रा तुझे दोष गुण ओळखूनी स्वतः हो स्वतःची खरी चाळणी तू