Tag: Ghazal in akshargan vrutta

  • लोचना – LOCHANA

    पर्ण दोन झळकतात जोडवी किनार दो चरण कृष्ण उमटतात पावले जलात दो मूर्त स्वरुप भावभोर सावळी जमीन ही धरण इंद्र बांधतोय जांभळ्या सुरांवरी गाल गाल गालगाल गालगा लगाल गा गालगाल गालगाल गालगाल गालगा हीच रे लगावली किती सुरेल भावना आवडेल का तुला नवीन गझल लोचना साधनेत पूजनात दंगलेत जीव हे प्राकृतीक मंदिरात शिल्प ना घडीव…

  • पडघम – PADAGHAM

    फुका न वाजे नकार घंटा गझल न माझी सुमार घंटा लगाल गागा गतीत चाले कुशाग्र बुद्धि तलवार घंटा नव्हेच कासव नसे ससा पण नसून भित्रा पगार घंटा न माळ कवडी मिळे न फुटकी जरी बडविल्या उधार घंटा हुमान फुसके नकाच घालू रुते कलेजी कट्यार घंटा जिथे जिथे मम जिनालये ही धरेल ठेका कुंवार घंटा सुरेल…

  • असूदे -ASOODE

    कान भरणारे असूदे काम करणारे असूदे खोल बुडणारे असूदे बुडून तरणारे असूदे लिहित जाता गैर काही कान धरणारे असूदे मीच माझे कर्म बांधे साक्ष बघणारे असूदे काय कोठे फरक पडतो हात धरणारे असूदे खायचे त्यांचेच त्यांना कैक तळणारे असूदे मी सुनेत्रा स्वाभिमानी लाख जळणारे असूदे

  • भद्र – BHADRA

    राम हृदयी राम कमली राम माझ्या श्याम नयनी राम रंगी राम वचनी राम ध्यानी राम भजनी गा सुनेत्रा राम प्रहरी आठवा बल भद्र जइनी राम बाणी कृष्ण धरणी घाम गाळे राम चरणी चाक फिरवे राम सजणी मम धनुर्धर राम करणी राम काष्ठी राम दगडी काय वर्णू राम कवनी जन्मभूमी जनक जननी गात फिरते गझल रमणी…

  • सद्दी – SADDEE

    ही जरी फोफावली कांही दुकाने जिद्दी पुरी तीच ती काढेन रद्दी उलथवूनी सद्दी पुरी या चला मांडून उकलू प्रश्न जे जे भंडावती सत्य धर्मी मी सुनेत्रा मिथ्य झटके रद्दी पुरी

  • पहार – PAHAAR

    धुके कपोती हवा गुलाबी निहार आहे शिशिर ऋतू पण बनी शराबी बहार आहे दवाळ बागा उले फुले केवडा सुगंधी परिमल कैदी कळी शबाबी तिहार आहे किती जरी घन तुझी लबाडी कुटील कपटी तुज उडवाया हजरजबाबी प्रहार प्रहार आहे तडाग भूवर गडद निळे जल दलात मिटल्या.. सजीव स्वप्ने दिवाण काबी न हार आहे नवीन क्षुल्लक जिनागमातिल…

  • कुरल सृष्टी – KURAL SRUSHTEE

    रंगली मेंदीत भिजुनी गार हिरवी गझल सृष्टी बिल्वरी सोन्यात झळके ताम्र तांबुस धवल सृष्टी लेखणीने मी खणे ती अक्षरांची खाण आहे हरघडी लयलूट करण्या वर्णमाला नवल सृष्टी वाट वळणाची जरी ही पावलांना साथ देते जिनस्तुतीमय काव्य तिरुवल्लूवरांची कुरल सृष्टी गच्च आभाळी कडाडत वीज भेदे जलद भारी कोसळे पाऊस धो धो प्राशुनी जल सजल सृष्टी नीर…