Tag: Ghazal in maatraa vrutta

  • खयाल – KHAYAL

    खयाल दिलका खाव्ब सुनहरा धर्म अहिंसा खाव्ब सुनहरा किताब पन्ने भारत भूमी सत्यमे उतरा ख्वाब सुनहरा

  • वाकड – VAAKAD

    विटी कोलली वाकड झाली झोप उडाली झापड झाली लाट लाटली इतुकी पातळ तळून पोळी पापड झाली बारा वाजुन गेल्यावरती कशी आरती काकड झाली कणकेमधुनी मोहन गायब शिळी चपाती वातड झाली खच्चुन भरला मिथ्य मसाला कथा मूळची भाकड झाली जगी मिरविण्या घेतलीस जी जबाबदारी कावड झाली जिन धर्माची ध्वजा पेलण्या आज सुनेत्रा धाकड झाली

  • तिडी – TIDEE

    पावलात दो तिडी असूदे वा दुर्वांची जुडी असूदे हळद उतरण्या अंध रुढींची दोन नयांची शिडी असूदे मुक्तक झाले पूर्ण तरी पण तिसऱ्या शेरी उडी असूदे शरी कुडीतच जीव जरी रे ऊर्ध्व गतीची छडी असूदे रत्नत्रय अंतरी सुनेत्रा सिद्ध गझल पोतडी असूदे

  • काय – KAAY

    काय लिहू मी काय लिहू काय कोण का प्रश्न लिहू प्रश्न नको तर उत्तर घे काय पुढे दो टिम्ब लिहू विरामचिन्हे टपटपती काय देह तनु चिंब लिहू खरा देव मम आत्मगुरुच काय कशाला मीच लिहू शेर खरे की वाघ बरे काय सुनेत्रा नाव लिहू

  • भूल – BHUL

    मन कधी पारवा रे कळ गूढ गार वारे घन भूल भुलाबाई मन राग मारवा रे वन गर्द सावलीचे मन नवा कारवा रे तन बर्फ गोठलेले मन तसे ठार वारे हातभर भुई माझी मन म्हणे सारवा रे

  • चहाडी-CHAHADI

    आज कोणती नेसू साडी प्रश्न मला ना अता पडेआज चालवू कुठली गाडी प्रश्न मला ना अता पडे जीव जगावे इतुकी इच्छा सदैव माझ्या मनी वसेआज लुटावी कुठली वाडी प्रश्न मला ना अता पडे बाड धाडले कुणीतरी मज रंगबिरंगी रद्दीचेआज कोणते पुस्तक बाडी प्रश्न मला ना अता पडे ताडी माडी नीर गाळणे धंदा माझा प्रिय मजलाआज…

  • रब – RAB

    असशिल तू जर कलम कसाईमी संजीवन अक्षर साई रदीफ आहे सवे काफियाशब्द अब्ज नव मम रब साई स्वर काफियाच अन स्वर बाराअसिआउसा ओम म्हण साई कर्त्याच्या वारी शनिवारीमला प्रिय तव आर्जव साई मांगीतुंगी गजपंथालाजाय सुनेत्रा हाच वसा ई