Tag: Ghazal in maatraa vrutta

  • कृतार्थ -KRUTARTH (GRATEFUL)

    मुक्तक १) … कृतार्थ कृतज्ञता मम कृतार्थ झाली बुडून कृष्णेत पार्थ झाली ल गा ल गा गा लगावलीने तरून आली स्वरार्थ झाली मुक्तक २)… संदेह म्हणतिल कोणी कष्ट नको कोणी म्हणतिल घाम नको घाण मनातिल जाता जाता घडेल सेवा संदेह नको

  • लिपी – LIPEE (SCRIPT)

    लिपी… ब्राम्ही बुटी मम कागदी आहे खरी ब्राम्ही लिपी निर्झर नदी आहे खरी गा आत्मजा गा सुंदरी अंकी लिपी ब्राम्ही स्वरी अक्षरपदी आहे खरी रोमांच… रोम रोम ते रोमांच मस्त शहारे रोमांच ताठ जाहले रोमांच फ़ुलूनी खडे रोमांच

  • अनवट – ANAVAT(UNMATCHED)

    अनवट कोडे मृदुल उकलले उकलीमध्ये अजून काहीं अनवट अनवट नाताळातिल शेकोटीची धूसर चाहुल दिशांत दाही अनवट अनवट वक्र स्वभावी सरळ जाहले बिळात शिरण्या बीळच फुटले जळी चिंबले त्यांस तपविण्या शिशिरामधले ऊन हिवाळी त्राही त्राही अनवट अनवट शुद्धात्म्याला फक्त पूजिती गुणानुरागी नाव असूदे काहीपण मग देह दिगंबर जिनवर ब्रम्हा आदम येशू ईश इलाही अनवट अनवट विहिरीतिल…

  • नरद – NARAD(TOKEN USED IN BOARD GAMES)

    रुबाई … घेतात विसावा गुरे वासरे गाई डोळ्यात दाटते हिरवी कुरणे राई हा निसर्ग देई दान इथे अन तेथे हा शांत मनाच्या पार इथे अन तेथे गझल … नरद कसे फिरवशिल नरद पटावर बुद्धीबळाच्या बोल विकून चिक्की नक्की बिक्की चाली तुझ्या तू टोल मिरवायाला मोठेपण बघ घाई किती रे तुझी कुणी न उत्सुक उरली प्यादी…

  • धात्री – DHATRI(MID WIFE)

    तीन रुबाया एकल… वड्यास एकल कधी न खावे खावे पावासंगे नाहीतर मग युद्ध प्रकृती कफ पित्ताचे रंगे छातीमधुनी घशात येता खोकुन खोकुन ठसके लसुण पाकळ्या चावुन खाव्या कोमट पाण्यासंगे दवांई … हरित पीत अन श्वेत कफाने वात आणला बाई वैद्यांचा मग घे तू सल्ला सत्त्वर कर घाई छातीमध्ये न्युमोनियाची जाळीवर जाळी टाळशील जर पथ्य दवांई…

  • जिनप्रतिमा – JIN PRATIMA (IDOL OF JIN)

    दोन रुबाया जिनदेव … रुबाईची लय पकडून झरते झरझर अक्षर गाणे जिनदेव अंतरी वसे दिगंबर जगण्या स्वतंत्रतेने कशास शोधू देव काष्ठी अन जळी स्थळी पाषाणी झरझर झरती भूमीवरती माझी अक्षरगाणी जिनप्रतिमा … या ब्रह्मांडाचा धर्म अहिंसा जिनानुयायांचा मम देहच अवघा झाला आहे जिनमंदिर सांचा अंतर्यामी जिनप्रतिमा स्थित नित्य दर्शनासाठी जिनवानी ज्ञानामृत पाजे सत्य पंच परमेष्ठी

  • कोसला – KOSALA (A COCOON)

    दोन रुबाया १) कोसला.. होऊन फुलपाखरु मकरंद प्राशाया कोसला धडपडे कोष फोडुनी सुटण्या घोळात रुबाई मात्रांच्या पण येई स्वातंत्र्य जपाया मार्ग स्वतःचा घेई… २) पाकळी मृदु पाकळी मनाची प्रेमे उलगडता दवबिंदुत भिजुनी सहजच विरघळता जा भेट जनांसी सांगाया हित कानी गुलझार हवेवर लहरत पानोपानी …