-
किमयागार – KIMAYA-GAAR
करमत नाही मम जीवाला घराशिवाय मैत्र जवळचे खरे कुणाशी स्वतःशिवाय भरती आली अन ओहोटी पाठोपाठ सागर तीरी अगणित मासे गळाशिवाय तडफडणाऱ्या मासोळ्यांचा खच रेतिवर तप्त वालुकी जगतिल कैश्या जळाशिवाय उभ्या आडव्या रेषा रेखुन तर्जनीने खेळ रंगतो मृदुल मृदेवर पटाशिवाय हृदय जिनालय शुद्ध भाव मम किमयागार पूजन करण्या चरण कुणाचे जिनाशिवाय
-
किमया – KIMAYA
माल्यश्री वृत्तातिल किमया मंत्र जपू पिसे लागले तरी मतीने तंत्र जपू प्राणज्योत तेवण्या मंदिरी गाभारी देहवल्लरीतिल हृदयाचे यंत्र जपू वृत्ताचे नाव – माल्यश्री वृत्त प्रकार – मात्रावृत्त मात्रा – २२ (१६/ ६)
-
रदीफ RADEEF
आज कोणता शब्द वापरू रदीफ म्हणुनी तंग काफिया हिंदी उर्दू खलीफ म्हणुनी गुरू इलाही जैसा कोणी असेल जर तर सहजच सुचले तीन काफिये शरीफ म्हणुनी एक जाहले दोन शब्द हे मजनू मजनी कुठला निवडू रामबाण मी अलीफ म्हणुनी साक्षी भावे न्याय कराया शब्दार्थांचा भाव खरोखर टिकेल सच्चा हनीफ म्हणुनी लतीफ आणिक हनीफ मिळता गझल पूर्ण…
-
खयाल – KHAYAL
खयाल दिलका खाव्ब सुनहरा धर्म अहिंसा खाव्ब सुनहरा किताब पन्ने भारत भूमी सत्यमे उतरा ख्वाब सुनहरा
-
वाकड – VAAKAD
विटी कोलली वाकड झाली झोप उडाली झापड झाली लाट लाटली इतुकी पातळ तळून पोळी पापड झाली बारा वाजुन गेल्यावरती कशी आरती काकड झाली कणकेमधुनी मोहन गायब शिळी चपाती वातड झाली खच्चुन भरला मिथ्य मसाला कथा मूळची भाकड झाली जगी मिरविण्या घेतलीस जी जबाबदारी कावड झाली जिन धर्माची ध्वजा पेलण्या आज सुनेत्रा धाकड झाली
-
तिडी – TIDEE
पावलात दो तिडी असूदे वा दुर्वांची जुडी असूदे हळद उतरण्या अंध रुढींची दोन नयांची शिडी असूदे मुक्तक झाले पूर्ण तरी पण तिसऱ्या शेरी उडी असूदे शरी कुडीतच जीव जरी रे ऊर्ध्व गतीची छडी असूदे रत्नत्रय अंतरी सुनेत्रा सिद्ध गझल पोतडी असूदे
-
काय – KAAY
काय लिहू मी काय लिहू काय कोण का प्रश्न लिहू प्रश्न नको तर उत्तर घे काय पुढे दो टिम्ब लिहू विरामचिन्हे टपटपती काय देह तनु चिंब लिहू खरा देव मम आत्मगुरुच काय कशाला मीच लिहू शेर खरे की वाघ बरे काय सुनेत्रा नाव लिहू