-
चूर्ण – CHOORN
ग़ज़लेवरती गझल लिहाया गझल पुन्हा झाले गझलेला मम दाद द्यावया तरल पुन्हा झाले विडंबनाची व्याख्या शोधुन विडंबने लिहिली विडंबनासम वक्र होउनी सरल पुन्हा झाले परिमल खोडुन परिमळ लिहिले मागे मी गेले काफियास टाळाया सवती कमल पुन्हा झाले कवितांच्या मी गझला केल्या गझलांच्या कविता काव्य त्यातले जपण्यासाठी सजल पुन्हा झाले स्वतःस वाटुन मी पाट्यावर चूर्ण मऊ…
-
वनभृंग – VAN BHRUNG
घनदाट कुंतलावरी कृष्ण तव लिहिल्या श्यामल गझला मीही वनभृंग जणू तव नयनांवर दो लिहिल्या निर्जल गझला मीही भिजवून भावना दवबिंदूंनी पिंपळ पानावरती सुकल्या मम् जुनी लेखणी झरझर फिरवुन लिहिल्या मंगल गझला मीही मनमोर नाचता मेघांच्या छायेत फुलवुनी पूर्ण पिसारा आसूड मेघनेमधून ओढत लिहिल्या चंचल गझला मीही भरभरुन ओंजळी उधळत मोती जलद गर्जता आभाळातुन तापून कावल्या…
-
देवनागरी – DEV NAAGAREE
देवनागरी लिपी मराठी माझ्या हाती सुंदर काठी कन्नड हिंदी इंग्रजीतही गरगर फिरते माझी लाठी अवघ्या ब्रह्मांडात फिराया धन शब्दांचे माझ्या गाठी चिरतारुण्याचा वर मजला उलटूदे पन्नाशी साठी भिऊ कशाला बोलायाला निसर्ग ईश्वर माझ्या पाठी
-
कोळ्यांची बाळे – KOLYAANCHEE BAALE
स्वप्न गुलाबी अथवा काळे अनवट झाले त्याचे जाळे नको करू जाळ्याचा गुंता खेळुदेत कोळ्यांची बाळे पोखरती घर मुळे जयांची खणून काढू त्यांची पाळे राव रंक हा भेद जिथे रे त्या गुत्त्याला लावू टाळे विसरायाला स्मृती कालच्या करू नको तू भलते चाळे मम गझलांना जपण्यासाठी नित्य कागदांना मी जाळे सुगंध शिंपायास सुनेत्रा केसांमध्ये जुईस माळे
-
प्रतीके – PRATEEKE
प्रतीके देती, नित्य निराळा, बोध वेगळ्या जीवांना.. प्रतीके अनवट, कधी आणिती, क्रोध वेगळ्या जीवांना….. प्रतिमा रेखीव, पाण्यामधली, सतत डोलता वाऱ्याने.. प्रतीके म्हणती, काव्यांमधुनी, शोध वेगळ्या जीवांना…..
-
हितकर – HITAKAR
लिहावयाला भिऊ कशाला प्रश्नचिन्ह मग लिहू कशाला लिहिणे करते मुक्त मनाला तर दुःखाने झरू कशाला अर्थ काढते सदैव हितकर शब्दांमध्ये फसू कशाला हृदय बोलते घडले सुंदर कुरूप भू ला म्हणू कशाला अंधश्रद्ध ही नव्हे “सुनेत्रा” श्रद्धेला मी डसू कशाला गझल मात्रावृत्त (मात्रा १६)
-
उखळ – UKHAL
रदीफ काफियासवे गझल मस्त शोभते तंग जरी काफिया ग वसन चुस्त शोभते सारवान आज नको तूच उंट हाक रे पुनवेची चांदरात ग्रहण गस्त शोभते भेटण्या मला बरी पुलावरील झोपडी महागड्या घराहुनी स्वच्छ स्वस्त शोभते गण मात्रा लगावली तराजूत तोलण्या लष्करची तुला गडे शान शिस्त शोभते हत्तीवर पागोळ्या बसुन बरस बरसती भरला घट उखळ मुसळधार हस्त…