-
कळशी – KALASHEE
पेटुनीया कळशी पेटली मरिचीची ढग उशी पेटली मार्जात्याच्या घोडचुकीनें हॅरीची मावशी पेटली काढेपंडित मंत्र विसरता सणक मस्तकी कशी पेटली विषमय काढा कढईमधला ओतण्यास सांडशी पेटली पॉटर कुंभारास भेटण्या टणक कपाची बशी पेटली फुकनीने मी फुंक मारता एक चूल आळशी पेटली राख पेरता हलके हलके वाडग्यात लापशी पेटली गझल मात्रावृत्त (मात्रा १६)
-
गॅरी पॉटर – GARRY POTTER
जंतर मंतर शिकण्यासाठी हॅरी पॉटर करे कशाला जंतर मंतर कॅरी पॉटर आवडती अक्षरे जुळवुनी चित्र रेखुनी रंग उधळुनी नाव मिळव तू मॅरी पॉटर प्राकृत हिंदी माय मऱ्हाटी तिला मायना प्रिय अथवा प्यारीच लिहूया पॅरी पॉटर मने प्रफुल्लित होण्यासाठी मैफलीत या रमू गझल नि शेर शायरीत गॅरी पॉटर मंत्र जादुई कैक बनविण्या माझी भाषा मस्त निराळी…
-
क्विडिच – QUIDDITCH (GAME)
चानेमका आरसा दाखवी अपुल्या आतिल इच्छा शोभिवंत सोनेरी बॉर्डर प्रतिबिंबातिल इच्छा निवड व्हावया घाला टोपी समूह कळण्यासाठी ज्याने त्याने खरी जाणण्या सुप्त मनातिल इच्छा केरसुणीने मैदानावर खेळ क्विडिच खेळाया पावसातही जमेल सुंदर ही हृदयातिल इच्छा छूमंतर गल्लीत पोचण्या छूपावडर टाकुनी शिरू शेगडीमधेच म्हणते नव जन्मातिल इच्छा लिही ‘सुनेत्रा’ मनापासुनी वाचत “हॅरी पॉटर” घुसळत घुसळत शब्द…
-
हॅरी पॉटर – HARRY POTTER
स्वतःच आहे एक परीस हॅरी पॉटर कार्य नेतसे पूर्ण तडीस हॅरी पॉटर कसाबसा एकलाच जगला डर्सलींच्यात डडलीला तो म्हणे खवीस हॅरी पॉटर जादुई शाळेत शिकाया हॉगवर्टसला येता विसरे कटू स्मृतीस हॅरी पॉटर विजलींचे घर गप्पाटप्पा पुडींगच्या त्या कधी न विसरे मस्त चवीस हॅरी पॉटर हर्माइनी नि रॉन सोबती जिवलग त्याचे खुषीत आहे आज मितीस हॅरी…
-
रोज लोटस (ROSE LOTUS)
रोज लोटस व्हॉटसपवरी दिसतात रोज रोज रोज टपोर गुलाबकळ्या फुलतात रोज रोज झेंडू जाई लिली चमेली सोनटक्क्याचं कुसुम रोज साजरा करायला “डे” खुडतात रोज रोज केवडा बकुळ गुलबक्षी अन भुईचंपक डेझी रोज काव्यात डोकावतात खुलतात रोज रोज बोगनवेली रंगबिरंगी कुंपणावरच्या पऱ्या रोज माझिया रोजनिशीवर उडतात रोज रोज अक्षरगाडीतुन फिरताना गझलफुलांचे मळे रोज जादुई छडी फिरविता…
-
पंचपरमपद – PANCH-PARAM-PAD
उत्तम दशगुण धर्म जाणती मुनी दिगंबर उत्तमतेचे मर्म जाणती मुनी दिगंबर चौविस तीर्थंकर जैनांचे जैन मंदिरी उत्तम अवघड कर्म जाणती मुनी दिगंबर द्रव्यलिंग अन भावलिंग युत पंचपरमपद उत्तम त्यांचे घर्म जाणती मुनी दिगंबर काळे गोरे भुरे गव्हाळी अनंत निवडक उत्तम अस्सल चर्म जाणती मुनी दिगंबर अंगांगावर ठेवायाला बोट कसेही उत्तम कुठले वर्म जाणती मुनी दिगंबर…
-
काझी – KAAZEE
भारत भूमी माता माझी जिनानुयायी पिता भारत भूमी मारे बाजी जिनानुयायी पिता धर्म अहिंसा हृदयामध्ये जपण्यासाठी सदा भारत भूमी लढण्या राजी जिनानुयायी पिता मिया नि बीबी असता राजी लग्नासाठी जिथे भारत भूमी होते काझी जिनानुयायी पिता वृद्ध जाहली जरी वयाने कुंतल पिकले जरी भारत भूमी सदैव ताजी जिनानुयायी पिता कटू विषासम सत्य पचवुनी जगण्यासाठी पुन्हा…