-
लाडू – LAADOO
डिंकाचे मी खाईन लाडू हक्काने मी खाईन लाडू दाबत फिरवत वळून झेलून हाताने मी खाईन लाडू राजगिरा चुरमूरे चण्यांसह लाह्यांचे मी खाईन लाडू लिच्ची पेरू चेरी जांभूळ बोरांचे मी खाईन लाडू दुःख न उरले बाकी ‘सुनेत्रा’ बुंदीचे मी खाईन लाडू
-
तूळ – TOOL
चूळ ईश्वरी मूळ ईश्वरी रत्नत्रयमय सूळ ईश्वरी नवरंगांची धूळ ईश्वरी गोत्र धर्म मन कूळ ईश्वरी येशूचा तो सूळ ईश्वरी न्याय अंतरी तूळ ईश्वरी पुण्यपाप ढ-ग ढूळ ईश्वरी दोन समांतर रूळ ईश्वरी ऊस ‘सुनेत्रा’ गूळ ईश्वरी
-
सती – SATEE
झळझळीत प्रकृती संस्कृती पारस पद्मावती संस्कृती धरणीधर शासन देवांची पूर्ण सिद्धता मती संस्कृती संस्क्रित संस्कृत वैय्याकरणी ग्रामर ग्राहक गती संस्कृती सहज लीलया बोल इंग्रजी माय मऱ्हाटी जिती संस्कृती आजी माजी भावी शोभे जैन ‘सुनेत्रा’ सती संस्कृती
-
ऊ – OO
नवे पेन मी पुट पुटस्फुट गेट केन मी पुटपुटस्फुट मराठीत बोलू पटपट लेनदेन मी पुट पुट स्फुट केस मराठी अव्वल ऊ लीख हेन मी पुटपुट स्फुट होंडा फटफट पद बुलेट कार झेन मी पुटपुट स्फुट दशग्रंथी नच दशधर्मी दहा टेन मी पुटपुट स्फुट व्याज फायदा बड्डी रे लाभ गेन मी पुटपुटस्फुट दुष्ट ‘सुनेत्रा’ येन केन…
-
भृंगधर – BHRUNGADHAR
जलवंती फुलवंती जलधर जलद मेघ घन गिरिधर गुणधर ढग आभाळी श्यामल श्यामल जणु गंगाधर गगनी हलधर कृष्णाकाशी रेघ विजेची गजावरी आरूढ भृंगधर तमी उजेडी पुण्य पाप बघ अर्घ्य द्यावया शुद्ध भाव धर मिटून डोळे रव श्वासाचा ऐक सुनेत्रा करी बिंब धर
-
शेष – SHESH
थेट वागणूक ग्रेस कवीची हीच करमणूक फ्रेश कवीची कधी नच केली काळी चोरी अशी ग जपणूक शेष कवीची शुद्धात्म्याला कधी न सोसते ढोंग फसवणूक लेश कवीची हृदयी जादुई मंत्र अहिंसा अशी कळ जणूक रेष कवीची करेल आता कपास भरूनी बशी अडवणूक प्रेस कवीची किती ग तोरा नटी मिरवशील करुन पिळवणूक देश कवीची जपून सुनेत्रा झरे…
-
हिरा – HIRAA
गेंद गोलसर कुंकू वर्णी गुलाबपुष्पांचा लाल जर्द जणु झेंडू चेंडू रुबाब पुष्पांचा घोळुन परिमल घोळामध्ये झाला गडद किती झोक जांभळा शौक गुलाबी शबाब पुष्पांचा लाचारी नच कर्तव्याचा धर्म मार्ग मिळता नोंदवून घे खतावणीतिल जवाब पुष्पांचा शांत पहुडल्या निळ्या झुल्यावर पारुल सुमन कळ्या वाटिकेतल्या झुडुपांवरती जुराब पुष्पांचा मोक्षस्थळीच्या वाटेवरती कुसुमांकित वेली खरा सुनेत्रा हिरा कोंदणी किताब…