-
कारंजे – KAARANJE(FOUNTAIN)
नयन मनोहर कारंजे तुषार सिंचन उदक पडे किती खोदशिल खोल दरी किती दिवस हा खेळ गडे चंदन मात्रा उगाळुनी बाराखडी ग गझलेची जिनेश्वरावर स्तवन स्फुरे छत्र धराया नाग फडे जमीन आणिक शेर गुणी सहज जुळावे पंचांगी रत्नत्रय हृदयात वसो जाणण्यास व्यापार धडे निसर्ग गाथा गात रहा जिनायतन मन साथीला अभिषेकास्तव प्रतिमेच्या भाव जलाचे पूर्ण घडे…
-
ग्रंथ – GRANTH(TREATISE)
ग्रंथ चेहरा भिंत बोलकी आभाळ सजल घन कृष्ण फळा धुंवाधार जलदांतुन मोती गाळिव जल धारोष्ण झळा अक्षरगण अन मात्रा वृत्ते ना पोरखेळ ही गझल विधा गझलियतेवर तरे लीलया तन तहानलेला हरित मळा शब्दकोश मम मुक्त उधळुनी भरून वाहते कोषागार ओंजळ सांडे करकमलांची लागल्या जिवा निर्मिती कळा निःकाचित कर्मे जाळाया ध्यानाग्नीने पेटव समई धर्म अहिंसा संयमात…
-
जिन बागवान – JIN BAGVAN(GOD)
-
फेरा- FERAA(ROUND TRIP)
-
दृष्टी – DRUSHTI(VISION)
कर्म करावे अथवा भक्ती जाण जिवा निर्मल परिणामांनी मुक्ती जाण जिवा निमित्त असती शब्द अक्षरे पर्यायी विशुद्धतेने लाभे शक्ती जाण जिवा आत्म्यामध्ये शोध सुखाला शांतीला बुद्धीवादी चाले युक्ती जाण जिवा नाद जीवाला हवा जिनांचा दशधर्मी मुनी असावा ग एकभुक्ती जाण जिवा दृष्टी सम्यक नाव सुनेत्रा लिहिते मी झाली सगळी बाकी चुक्ती जाण जिवा
-
चरित – CHARIT(CHARACTER)
-
नाटक – NATAK (DRAMA)