-
पत्र पीयूष – PATRA PEEYUSH
जपुन ठेवले अजुन अंतरी तुझ्या स्मृतींचे पत्र पीयूष जरी जाळले जरी फाडले पुरून उरले पत्र पीयूष अता न चिंता कशाकशाची पार जाहली सर्व संकटे सदा सुखाने जगावयाचे हृदयी भिजले पत्र पीयूष पऱ्या देवता रानपाखरे किलबिल त्यांची झाडावरती शिंपित उधळित दवबिंदूसम पानांवरले पत्र पीयूष गुणांस वाचत सुचल्या गोष्टी जादुई वनदेवींच्या मज त्यांस गुंफता कुसुमांभवती बनले गजरे…
-
इमान इतबरे – IMAAN ITABARE
धंदा अथवा असो चाकरी इमान इतबरे तू कर रे हिशेबास ही चोख असावे तुझे वचन खरे तू कर रे प्रकृतीस तव मानवणारा धर्म उजळण्या अंतर्यामी खऱ्या दिगंबर गुरूस वंदन झुकुनी दो करे तू कर रे नकोस तोडू नाजुक पुष्पे सजविण्यास पुद्गल काया टपटपलेल्या प्राजक्तांचे गुंफुनी गजरे तू कर रे व्यवहाराने साध निश्चया नय कसरत ही…
-
ब्रम्हवादिनी – BRAMHAVAADINEE
ब्रम्हवादिनी तू जैनांची प्रथम ब्रम्हचारिणी अग्नीमध्ये तापवून घे कलम ब्रम्हचारिणी मिळव संपदा मुक्तीसाठी स्वधर्मास जाणुनी शुभ्र लेउनी वसन दिशांचे तलम ब्रम्हचारिणी मोक्षप्राप्तिचे शरीर साधन श्रमण संस्कृती म्हणे जीव जगाया किंचित होना गरम ब्रम्हचारिणी जरी ठेविले थंड मस्तका हृदय नीर तापते अशा प्रसंगी ठेव भावना सुगम ब्रम्हचारिणी रक्षण करण्या दिगंबरांचे सिद्धायनी देवी जिनानुयायी ब्राम्हसुंदरी प्रशम ब्रम्हचारिणी…
-
जिती – JITEE
ब्रम्हकमळ मम हृदयी फुलण्या शुद्ध शुद्ध हो तू भूमीमध्ये सत्य पेरण्या शुद्ध शुद्ध हो तू पर्युषणातिल दशधर्मांची शिडी चढायाला जिनधर्माची मेढ रोवण्या शुद्ध शुद्ध हो तू नकोस भटकू अंधारी या लाव दीप आता अंतर्यामी दिवा उजळण्या शुद्ध शुद्ध हो तू साक्षीभावानेच पहावे कर्मकांड सारे कांडामधले मिथ्य जाणण्या शुद्ध शुद्ध हो तू शशांक मधुरा यांच्यासाठी जिती…
-
जा जा मूढे – JAA JAA MUDHE
नकोच नाटक जा जा मूढे पुरे जाणले होते तुजला मी तेव्हाही अन आताही जाणत आहे वेळ यायच्या आधी नसते बोलायाचे म्हणुन बोलले कुणास नाही मन आताही जाणत आहे एकटीच का होती बसली निळावंतीसम तप्त दुपारी सोंग घेउनी विवाहवेदी वरती सजुनी ताप तापली हलकी झाली ढगात गेली जलदामधुनी कुठे बरसली घन आताही जाणत आहे शृंगाराने हुरळुन…
-
फुलझड्या – FUL ZADYAA
नको करू तू नको फारसा विचार माझा नको दाखवूस कोठे बसला प्रहार माझा थकले आता प्रहार करुनी विचार करुनी नको वाटते कुणी करावा पुकार माझा मला वाटते सर्व सोडुनी जावे का मी कुठे जायचे जिथे तिथे बघ तिहार माझा जीव गुंतला फुलांमधे या कसा सोडवू कसा द्यायचा गोड फुलांना नकार माझा पुणे सांगली साताऱ्याला जाणे…
-
“काहीहीहां श्री” – KAAHEEHEEHAA SHREE
ती मूढ जान्हवी हेकट जानू बाई आंधळी जाहली वृद्धा कानू बाई मृदु माय सावली भूतकरांची माता पण तीच गुणाची पणती तानू बाई फुलमाळ जयाची गळा घालण्यासाठी सानशी खार ती धावे चानू ताई कैवल्य चारुता मीर चंद्रमा दावी तंबोरा जुळवी मीरा गानू बाई बोलते सारखे, तुज “काहीहीहां श्री” भानावर ये श्री… म्हणते भानू बाई मात्रावृत्त –…