-
अत्तर दर्दी – ATTAR DARDEE
खळाळणारा बघत रसमयी धवल सांडवा भाळू कशाला तरल धुक्याच्या मलमलीतून रंग पारवा गाळू कशाला परवडणारी चैन सुगंधी दरवळणारी फुले वेलीवर शुभ्र कुंतली अत्तर दर्दी मूक ताटवा माळू कशाला जीव लावण्या जीवावरती कुत्रे मांजर पक्षी पारवे श्रावण बीवन पौष आषाढ पर्व भादवा पाळू कशाला पहाटवारा पहाट चुंबन टोक गाठता जाणीव नेणिव तोच तोच तो गूळ फोडुनी…
-
नेत्रांजन – NETRANJAN
उंची खोली कळली नाही पण केंद्रातुन ढळली नाही विद्वत्तेचा आब राखण्या उथळपणे खळखळली नाही बरे समजुनी जे घडले ते व्यर्थ कधी हळहळली नाही हृदयामधली करुणा जपण्या डोळ्यांतुन घळघळली नाही संयम इतुका तनामनावर वादळात उन्मळली नाही काजळीचे नेत्रांजन केले अंतर्यामी मळली नाही खळाळणारा झरा “सुनेत्रा” आग विझवली जळली नाही
-
नोटा नाणी – NOTA NANI
झाले भावघन गोळा नाती सायीहून दाट लोण्यासाठी विरजल्या राती सायीहून दाट वावटळी चक्रीवात धूप कर्पूर गाभारी झाले बीज अंकुरीत माती सायीहून दाट बंध तोडायचे कसे जोडणारी मुळाक्षरे ओततात नोटा नाणी पाती सायीहून दाट धान्य सुपात ओताया पोती माय सोडते ही झाले गळे ओठ मौन जाती सायीहून दाट पंचभूते डोलताती ताल ठेका देह देतो कंठातून मुक्त…
-
सूत्रबंधनी श्लोक- SUTRA BANDHANI SHLOK
धो धो हसण्या खळखळुनी जन निरोग निर्मल जोक हवा सृष्टीचे गुणगान गावया स्वर सैराटी झोक हवा अज्ञातातिल स्वर्ग सुखे या मनास नच रे लोभवती इथल्या बांबू बनात फिरण्या हवा हवा इहलोक हवा शौक भू वरी मम जीवाला ऊर्ध्व गतीचा जरी जडे स्वतः स्वतः झरणारा निर्झर शोक मुक्त निर्धोक हवा स्वरानुभूतीतिल तत्त्वार्थी चिंब भिजवुनी गाणाऱ्या पाठीवर…
-
उधारी – UDHAARI
मादक ओठांवरची मदिरा प्राशायाला हवी झिंग तयातिल चालीमध्ये मुरवायाला हवी स्पर्शाने मम उसळुन येता तव इच्छांचे नीर दो हातांनी लाट रुपेरी अडवायाला हवी मधुर गुपित चिरतारुण्याचे कळण्या मजला खरे तव नजरेतिल तडका मिरची चाखायाला हवी मिटशिल जेंव्हा नेत्रदलांना श्यामल तनूवरचे.. साठवुनी दव त्यातच मेंदी भिजवायाला हवी कुणास वाटे चोरी मारी असली तरही गझल.. कल्पकतेची म्हणे…
-
कळ – KAL
पल्लवित मन झाले तरुचे सुमन सुकले काळे तरुचे भाव घन अंबर धर नभ हे थोपवित शर भाले तरुचे वाऱ्यात सळसळत्या पाती वाजतात ग वाळे तरुचे दवबिंदूं चे करित शिंपण पूजन अर्चन चाले तरुचे काव्य कळ मी जलद सुनेत्रा सहज उघडे टाळे तरुचे
-
अप्रतिम – APRATIM
रंग संगती अप्रतिम वन हरिण सती अप्रतिम कर्म तपवून जाळण्या अंगार मती अप्रतिम योग भक्तिचा जिनांच्या ध्यानात रती अप्रतिम पंथ असो कोणताही दिगंबर यती अप्रतिम श्रीमती गुण कुमारिका सौभाग्यवती अप्रतिम