-
गळवट – GALHVAT
लटपट कळकट पाय सखी तव कंपीत काहून लटपट नटखट गाय सखी तव कंपीत काहून फुसफुस पुटपुट अस्फुट अक्षर ओढून ताणीत लटपट अनवट हाय सखी तव कंपीत काहून लवचिक कणखर वायर फायर इंग्लीश उच्चार लटपट झटपट फाय सखी तव कंपीत काहून जपत समरण कर कायर भेकड कोणी न सैनीक लटपट कडवट राय सखी तव कंपीत काहून…
-
कारवा – KAARVAA
दोन प्रहरी घे विसावा मारवा टाळू गडे कोळशाच्या शेगडीवर सार वाफाळू गडे ऊन आले बागडाया परसदारी अंगणी थांबल्या पाऊस धारा गारवा गाळू गडे घार भांडिक मोर शामा अन गवय्या गावया पाखरांना घाल दाणे पारवा पाळू गडे जाहली मळणी उफफणी ये भरू पोटी नवी बोर पपई ऊस चोरा खा रवा चाळू गडे वाळवंटी कारखाना चालवाया रेतिचा…
-
जै जिनेंद्र – JAI JINENDRA
जै जिनेंद्र जय जिनेन्द्र जै जिनेंद्र आहे जै जिनेंद्र पय जिनेन्द्र पै जिनेंद्र आहे सूर ताल गझल काव्य अक्षर गण मात्रा जै जिनेंद्र तय जिनेन्द्र तै जिनेंद्र आहे जादुई स्वरांवरून निखळ अर्थ हाती जै जिनेंद्र सय जिनेन्द्र सै जिनेंद्र आहे आसपास जिन सुनेत्र अंतरात हृदयी जै जिनेंद्र नय जिनेन्द्र नै जिनेंद्र आहे हस्त हात मम…
-
अकोळ – AKKOL
शास्त्रात घोळ कोठे शोधा बरे दमाने योगात टोळ मोठे शोधा बरे दमाने शेरा न मोल तोटे शोधा बरे दमाने गझली अकोळ गोठे शोधा बरे दमाने घटना जरी कळाली घटनेत घट पटाचा गावी मुधोळ लोटे शोधा बरे दमाने गागागागा लगा लगागा आहेच दोन वेळा देहास खोळ बोटे शोधा बरे दमाने जुल काफिया ग सवती आहे इथे…
-
ऋचा – RUCHA
घे लिंबलोण उतरुन आली वरात दारी घोड्यावरून उमद्या तृष्णा वधूत शिरली येता घरात स्वारी घोड्यावरून उमद्या वाटावया जनांना शमण्या क्षुधा युगांची बुंदी कळ्या करंज्या पात्रे अनेक भरुनी गाजे परात भारी घोड्यावरून उमद्या फुललाय सोनचाफा वारा सुगंध वाही कामास शांत करण्या चंपक गुलाब बकुळी तोले करात नारी घोड्यावरून उमद्या डोंगर निळा दिगंबर भासे मुनी तपोघन आभाळ…
-
शेकोटी – SHEKOTI
खळाळणारा बघत रसमयी धवल सांडवा भाळू कशाला तरल धुक्याच्या मलमलीतून रंग पारवा माळू कशाला परवडणारी चैन सुगंधी दरवळणारी फुले वेलीवर शुभ्र कुंतली अत्तर दर्दी धूप ताटवा जाळू कशाला जीव लावण्या जीवांवरती कुत्रे मांजर पक्षी पारवे श्रावण बीवण अश्विन कार्तिक पर्व भादवा पाळू कशाला पहाटवारा पहाट चुंबन टोक गाठता जाणिव नेणीव तोच तोच तो गूळ फोडुनी…
-
भाकीत – BHAKIT
हातावरील रेषा रेखून राम गेला वेळेत वेळ अपुली पाळून काळ गेला जगणे सवंग होता करतात खेळ कर्मे परधर्म बघ भयावह सांगून कृष्ण गेला पंचांग तू स्वतःचे लिहिण्यास शीक मनुजा रद्दी विकून नोटा लाटून टोळ गेला लोण्यासमान जमिनी झरत्या झळा उन्हाच्या बहरात ग्रीष्म आला कढवून तूप गेला मम शब्द ढगफुटीसम तू झेलता सुनेत्रा भाकीत भेकडांचे उडवून…