Tag: Marathi Baal-geet

  • नाताळ – NAATAAL

    येणार नाताळ नाताळ सुंदर झालंय आभाळ देऊया भेटी नाजूक नाती जपण्य़ा साजूक नाताळबाबाशी बोलूया मजेत गाणी गाऊया

  • एक करंजी – EKA KARANJEE

    एक करंजी खूपच रुसली कढईमध्ये बघ धडपडली चिडून कढई तिथून उठली चुलीवरी अन जाऊन बसली कढई मग तेलाने भरली फूंक मारिता चूल पेटली तेलालाही उकळी फुटली ताप तापुनी उकळ उकळली शुभ्र करंजी तयात फुगली बघून झारा खुदकन हसली थाळीमधल्या जळात पडली मासोळीसम त्यात पोहली बाळोबाने तिला उचलली चोखुन चावुन गिळुन टाकली

  • सोलकढी – SOLKADHEE

    इंग्रजी साहित्यातील ‘चिकन सूप’ या ललित-बंधांच्या पुस्तक मालिकेप्रमाणे काहीतरी लिहावे असा आज सकाळीच मी मनोदय व्यक्त केला. जर हा मनोदय संकल्प बनला तर तो यथावकाश पूर्ण होईलच! त्या पुस्तकासाठी मी ‘सोलकढी’ हे नाव निश्चित केले आहे. माझ्या कुटुंबियांसमवेत कोकण सहलीला गेलेली असताना माझ्या आठवणीनुसार मी सर्वप्रथम ‘सोलकढी’ प्यायले. तेव्हापासून ‘सोलकढी’ हे माझ्या प्रिय पेयांपैकी अतिशय…

  • अंकांचे गाणे – ANKAANCHE GAANE

    In this Marathi poem the poetess asks us all to overcome superstitions and blind beliefs. एक दोन तीन चार बुवाबाजी हद्दपार पाच सहा सात आठ श्रद्धा म्हणजे नाही गाठ नऊ दहा अकरा बारा उघडा खिडक्या येण्या वारा तेरा चौदा पंधरा सोळा अहंपणाला शिकवा शाळा सतरा अठरा एकोणीस वीस भयगंडाचा पाडा कीस एकवीस बावीस तेवीस चोवीस…

  • बुदू बुदु – BUDOO BUDOO

    काय कशाला कुठे कसे ? पुसू नको तू प्रश्न असे! हवे तुला जर उत्तर रे, कशास अर्धे प्रश्न बरे? पूर्ण वाक्य तू जुळव बघू; हसेल उत्तर खुदु खुदु! मिटतिल शंका बुदू बुदु…

  • पावश्या घूम – PAAVASHYAA GHOOM

    मूळ बाल-कविता – ये रे ये रे पावसा(कवी-अनामिक) घूम घूम पावश्या चारा देती मावश्या चारा आहे मऊ पाऊस तुझा भाऊ ये रे ये रे भावा भाषा शीक जावा भाऊ शिकला भाषा पणजा गुंडाळी गाषा…

  • कामाचा पाढा – KAAMAACHAA PAADHAA

    काम एके काम काम दुणे दाम काम त्रिक राम काम चोक साम कामा पाचे प्रीती काम सख रीती कामा सत्ते ज्योती कामा आठे स्नेह कामा नव्वे प्रेम काम दाहे देह कामा आकरे स्वार्थ कामा बारे परमार्थ